Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्रा कधी बनणार आई?, प्रश्न ऐकून नाराज झाली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 12:59 IST

प्रियंकाच्या लग्नाला नुकतीच दोन वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यानंतर आता तिला एका मुलाखतीत फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारल्यानंतर ती नाराज झाली.

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियंका बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी तिच्या ग्लॅमरस फोटोमुळे तर कधी निक जोनस आणि तिच्या केमिस्ट्रीमुळे. प्रियंका आणि निक ही जोडी बॉलिवूडमधील क्युट जोडी आहे. प्रियंकाने लग्नानंतर निक बद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. प्रियंकाच्या लग्नाला नुकतीच दोन वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यानंतर आता तिला फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारले जात आहे. अशाच एका मुलाखतीत प्रियंकाला प्रश्न विचारल्यानंतर ती नाराज झाली. सध्या माझ्यावर फॅमिली प्लानिंगचे दबाव टाकू नका, माझ्या आगामी चित्रपटावर लक्ष ठेवा, असे ती म्हणाली. 

'द व्हाइट टाइगर' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान प्रियंकाला फॉमिली प्लानिंगबद्दल विचारण्यात आले. त्यावर प्रियंकाने आई होण्याच्या इच्छेवर आपले मत व्यक्त केले आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. 

प्रियंका म्हणाली, मला नेहमीच मोठे कुटुंब आवडते आणि लहान मुले खूप आवडतात. मलाही जितकी होतील तेवढी मुले हवी आहेत. मला क्रिकेट टीम बनावयची आहे. हे बोलतानाचं पुढे हसत म्हणाली, ११ मुले थोडी जास्त होतील. मी याबाबत नक्की सांगू शकत नाही. त्यामुळे सध्या तरी मला फॅमिली प्लानिंगबद्दल दबाव टाकू नका आणि माझ्या आगामी चित्रपटावर लक्ष ठेवा. नक्कीच ११ मुलांबद्दल ती मस्करीत म्हणाली होती. 

प्रियंका चोप्रा लवकरच 'द व्हाइट टायगर' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात एका ड्रायव्हर बलरामची कथा रेखाटण्यात आली आहे. यातील ड्रायव्हर बलराम हलवाईची भूमिका आदर्श गौरव साकारणार आहे.

या चित्रपटाची कथा अरविंद अदिगा यांच्या 'द व्हाइट टायगर' या पुस्तकावर आधारित आहे. यात अभिनेता राजकुमार राव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासराजकुमार राव