Join us
Daily Top 2Weekly Top 5

भामट्यानं पळवली पूनम ढिल्लोची पर्स, रागारागात पोलिस ठाण्यात पोहोचले राज बब्बर... !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 10:25 IST

जाणून घ्या काय आहे भानगड...

ठळक मुद्देपूनम ढिल्लो व राज बब्बर सोलन जिल्ह्याच्या धर्मपूरजवळ शूटींग करत होते. अचानक भामटा आला आणि पूनम ढिल्लोची पर्स हिसकावून त्यानं पोबारा केला.

अभिनेत्री पूनम ढिल्लो ( Poonam Dhillon) सध्या हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहेत. या पंजाबी सिनोत त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेते राज बब्बरही ( Raj Babbar ) दिसणार आहेत. अशात सिनेमाच्या शूटींगदरम्यान असं काही घडलं की, राज बब्बर रागाने लाल झालेत. होय, एका भामट्यानं पूनम ढिल्लो यांची पर्स हिसकावून पळ काढला. यानंतर राज बब्बर यांना राग अनावर झाला आणि रागारागात ते पोलिस ठाण्यात पोहोचले.

पूनम ढिल्लो व राज बब्बर सोलन जिल्ह्याच्या धर्मपूरजवळ शूटींग करत होते. अचानक भामटा आला आणि पूनम ढिल्लोची पर्स हिसकावून त्यानं पोबारा केला. या घटनेनंतर राज बब्बर थेट येथील पोलिस ठाण्यात पोहोचले. यानंतर काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला थेट सिनेमाच बघावा लागेल. होय, कारण ही घटना प्रत्यक्षात घडली नाही तर हा चित्रपटाचा एक सीन होता. पण या सीनच्या निमित्तानं राज बब्बर धर्मपूरच्या खरोखरच्या पोलिस ठाण्यात पोहाचले. या ठाण्यात चित्रपटाचे काही सीन शूट केले गेले. शॉट्स ओके झाल्यानंतर राज बब्बर यांनी ठाण्यात तैनात पोलिस कर्मचा-यांसोबत चहा घेत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. पोलिसांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानलेत. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुकही केले.

टॅग्स :राज बब्बरपुनम ढिल्लो