Join us

डिम्पल कपाडिया आणि सनी देओलच्या नात्याबद्दल कळल्यानंतर अशी होती सनीच्या पत्नीची अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 18:10 IST

डिम्पल आणि सनी यांच्या अफेअरची चर्चा मीडियात होत असली तरी पूजा यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले होते.

ठळक मुद्देसनीने जेव्हा रूपेरी पडद्यावर एंट्री केली तेव्हा हळूहळू त्याची लोकप्रियतादेखील वाढू लागली होती. धर्मेंद्र यांनीच सनीचे लग्न जगासमोर येऊ दिले नसल्याचे बोलले जाते.

सनी देओल आणि पूजा देओलचे १९८४ मध्ये लग्न झाले आहे. सनीने त्याच्या करिअरची सुरूवात करण्याआधीच त्याचे लग्न झाले होते.

सनीने जेव्हा रूपेरी पडद्यावर एंट्री केली तेव्हा हळूहळू त्याची लोकप्रियतादेखील वाढू लागली होती. धर्मेंद्र यांनीच सनीचे लग्न जगासमोर येऊ दिले नसल्याचे बोलले जाते. लग्नानंतर खूप दिवस पूजा लंडनमध्ये राहिल्या. सनी देखील पूजा यांना भेटण्यासाठी लपून छपून लंडनला येऊन जाऊन असायचा.

जेव्हा मीडियामध्ये या दोघांच्या लग्नाच्या बातम्या यायला सुरू झाल्या तेव्हाही लग्नाची बातमी सनीने नाकारली होती. काही काळानंतर सनीनेच लग्न झाल्याची बातमी खरी असल्याची मीडियाला सांगितले होते. सनी आणि पूजा यांच्यात सगळे काही सुरळीत सुरू असताना डिम्पल कपाडिया सनीच्या आयुष्यात आली. 

सनीमुळेच डिम्पल आणि राजेश खन्ना वेगऴे राहू लागले असे म्हटले जाते. त्याकाळात डिम्पल आणि सनी यांच्या अफेअरची चर्चा मीडियात होत असली तरी पूजा यांनी याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले होते. पण सनी डिम्पलच्या प्रेमात वेडा झाला आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मुलांसोबत घर सोडून जाण्याची धमकी त्यांनी दिली होती. पूजा यांचा हा अवतार पाहून डिम्पलसोबत काहीही संबंध ठेवणार नसल्याचे सनीने कबूल केले होते असे म्हटले जाते. पण काही वर्षांपूर्वी लंडनच्या रस्त्यावरील सनी आणि डिम्पलचा हातात हात घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

टॅग्स :सनी देओलडिम्पल कपाडिया