Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन् समीर चौघुलेंना पाहून सोनू निगम म्हणाला, "मी तुम्हाला ओळखतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 16:22 IST

सोनू निगमचे 'ते' शब्द ऐकताच भारावून गेले समीर चौघुले, शेअर केली खास पोस्ट

समीर चौघुले हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. विनोदाचं अचूक टायमिंग साधून हास्याचे फवारे उडवणाऱ्या चौघुलेंनी अनेक कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. वेगवेगळ्या नकला आणि कमालीचा अभिनय करून प्रेक्षकांना हसवणाऱ्या समीर चौघुलेंना कोण ओळखत नाही. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगमलाही चौघुलेंची ओळख करून देण्याची गरज पडली नाही. 

सोशल मीडियावर चौघुलेंच्या स्किटमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. त्यांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. चौघुले सोशल मीडियावरुन चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबाबत पोस्टद्वारे माहिती देताना दिसतात. चौघुलेंच्या अशाच एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समीर चौघुलेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सोनू निगमबरोबरचा फोटो शेअर केला आहे. "जेव्हा अतिशय टॅलेंटेड व्यक्ती म्हणते की मी तुम्हाला ओळखतो...मी तुम्हाला पाहिलं आहे...खूप छान वाटतंय...माझ्यासाठी ही फॅन मोमेंट आहे," असं कॅप्शन चौघुलेंनी या फोटोला दिलं आहे. 

दरम्यान, समीर चौघुलेंनी अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांत काम केलं आहे. कलाविश्वात येण्यापूर्वी ते एका कंपनीत नोकरी करत होते. सिनेसृष्टीत नाव कमावण्यासाठी चौघुलेंना नोकरीला रामराम केला. गेली अनेक वर्ष ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांनी 'चंद्रमुखी', 'टाइमपास ३', 'आजचा दिवस माझा', 'हवाहवाई',' बांबू' अशा सिनेमांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

टॅग्स :समीर चौगुलेसोनू निगममहाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार