अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत असते. श्वेता तिवारीने दोनदा लग्न केलं. पण दोन्ही नाती फार वेळ टिकली नाहीत. श्वेताचं पहिलं लग्न राजा चौधरीसोबत तर दुसरं लग्न अभिनव कोहलीसोबत झालं होतं. अभिनेत्रीने दोन्ही पतींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते.
राजा चौधरीशी घटस्फोट घेतल्यानंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत लग्न केलं. या लग्नातून दोघांना एक मुलगाही आहे. मात्र काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. श्वेतानेही अभिनवविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप होता. मात्र नंतर अभिनव कोहलीनेही आपलं स्पष्टीकरण दिलं आणि उलट श्वेतावरच आरोप केले आहेत.
अभिनव कोहलीने केले होते हे आरोप
अभिनव कोहली म्हणाला, "मी श्वेताला कधीही मारहाण केली नव्हती, ज्याचा उल्लेख पलकने तिच्या पत्रात केला होता. त्या थप्पडबद्दल मी दोघींची माफीही मागितली होती. हे सर्व कन्फ्यूजन श्वेता तिवारीने पसरवलं आहे. जेणेकरून मी घरगुती हिंसाचार केल्याचं सिद्ध होईल. पण हे अजिबात खरं नाही. मी महिलांना कधीही मारहाण केली नाही."
"श्वेतानेच उलट मला काठीने मारलं. मला राग येतो असं श्वेता म्हणते पण मी कोणालाही मारलेलं नाही. पण श्वेताने मला मारहाण केली आणि जेव्हा तिने हे केलं तेव्हा कोणीही आलं नाही कारण मी मीडियामध्ये गेलो नाही किंवा तिच्यासारखं मुलाला घेऊन पळून गेलो नाही. श्वेताने मला मारलं आहे. आपल्या मुलीचा वापर करून माझ्यावर खोटे आरोप केले. जगासमोर माझी चुकीची इमेज निर्माण केली" असं अभिनव कोहलीने म्हटलं आहे.