Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा शाहिद कपूर-मीरा राजपूतला विचारला होता 'सेक्स पोजिशन'वर प्रश्न, तेव्हा मीराने दिले होते बिनधास्त हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 14:44 IST

मीरा राजपूतने एका मुलाखतीत सेक्स लाइफबद्दल बिनधास्तपणे सांगितले होते. 

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी म्हणजे शाहिद कपूरमीरा राजपूत. मीरा ही सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. पण स्टाईलमध्ये ती बॉलिवूडच्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. शाहिदने स्वतः बॉलिवूडशी संबंध नसणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.आता हे दोघं मीशा व जैनचे पालक आहेत. मीरा फक्त स्टाइल व फॅशनच नाही तर बोल्डनेससाठीदेखील ओळखली जाते. एका मुलाखतीत तिने बेडरुम सीक्रेटदेखील सांगितले होते.

खरेतर एकदा शाहिद कपूरमीरा राजपूतने नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये नेहाने फेव्हरिट सेक्स पोजिशनबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर शाहिद शांत बसला पण, मीराने यावर बिनधास्तपणे उत्तर दिले. मीराचे उत्तर सांगताना शाहिद लाजताना दिसला होता.

शाहिदला शांत बसलेले पाहून मीरा म्हणाली की, मला वाटते की शाहिद बेडरुममध्ये खूप संयमित असतो. तो नेहमी मला सांगतो की काय करायचं आहे आणि काय नाही. मीराचे हे उत्तर ऐकून शाहिद लाजराबुजरा झाला होता. आता यात किती तथ्य आहे हे त्यांनाच माहित असेल.

शाहिद व मीरा बॉलिवूडच्या लोकप्रिय कपलपैकी एक आहे. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. मीराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे एक से बढकर एक स्टायलिश फोटो पाहायला मिळतील. लग्नानंतर झालेला बदल मीराच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळतो.

मध्यंतरी मीरा आणि शाहिद कपूर ‘नच बलिये’ शोला जज करणार असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. मात्र काही कारणामुळे मीराचे आॅनस्क्रीन झळकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. हातात कोणत्याही प्रकारचे काम नसतातना मीरा शाहिदपेक्षा जास्त चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टीव्ह असते.

2015 मध्ये मीरा व शाहिदचे लग्न झाले होते. दोघांनाही दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मीरा बॉलिवूडमध्ये येण्यास उत्सूक असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :शाहिद कपूरमीरा राजपूत