Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी मीशाच्या जन्मानंतर शाहिद कपूरने का मागितली होती आई-वडिलांची माफी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 08:00 IST

कारण वाचून कराल अभिनेत्याचे कौतुक

ठळक मुद्दे‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक लवकरच हिंदीत येणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूडचा चॉकलेटी हिरो शाहिद कपूर आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. शाहिद, त्याची पत्नी मीरा कपूर आणि मीशा व जेन या दोन्ही मुलांचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. शाहिद कपूर आपल्या पत्नी व मुलांवर किती प्रेम करतो, हे नव्याने सांगायची गरज नाही. पण पहिल्या मुलीच्या म्हणजेच मीशाच्या जन्मानंतर याच शाहिदने आपल्या मातापित्याची माफी मागितली होती. का? तर या का चे उत्तर तुम्हाला तुम्हाला सांगायलाच हवे.

होय, एका मुलाखतीत खुद्द शाहिदने याचा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, मीराशी लग्न झाल्यानंतर मी खूप आनंदात होतो. मीरा आयुष्यात आल्याने मी तिच्यात इतका गुंतला होतो की, मला जगाचा विसर पडला होता. मी माझ्यातच गुंतलो होतो. माझ्या आजुबाजूचे माझ्यावर प्रेम करणारे काही लोक होते. मात्र लग्नानंतर माझे त्यांच्याकडेही दुर्लक्ष झाले. यानंतर मीशाचा जन्म झाला. बाप बनल्यानंतर मात्र अचानक माझा मलाच मी अतिशय स्वार्थी झाल्याचा साक्षात्कार झाला. या स्वार्थापोटी मी माझ्या आईवडिलांना अजानतेपणी विसरलो होतो. त्यांनी माझ्यासाठी काय काय केले होते आणि लग्नानंतर या सगळ्या गोष्टींचा मला विसर पडला होता. मी त्याक्षणी माझ्या आईवडिलांची माफी मागितली. स्वत: बाप झाल्यानंतर मला माझ्या चुकांची जाणीव झाली. या सर्व चुकांसाठी मी त्यांची क्षमा मागितली. आज मी माझ्या आईवडिलांचा आधीपेक्षा अधिक आदर करतो.

2015 मध्ये मीरा व शाहिदचे लग्न झाले होते. दोघांनाही दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मीरा बॉलिवूडमध्ये येण्यास उत्सूक असल्याची चर्चा आहे.  

शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली होता. त्यानंतर आता तो आपल्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. ‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक लवकरच हिंदीत येणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. जर्सी हा चित्रपट एक स्पोर्टस ड्रामा असणार आहे. नुकताच या चित्रपटातील शाहिद कपूरचा क्रिकेट खेळतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

भाई ऐसा मत करो, NCB आ जाएगी...! शाहिद कपूरने व्हिडीओ पाहून फॅन्स झाले अवाक्

पंकज कपूर यांना का दिला घटस्फोट? शाहिद कपूरची आई 36 वर्षांनंतर बोलली...! 

टॅग्स :शाहिद कपूर