Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजीव कुमार यांनी हेमा मालिनी यांना लग्नासाठी केलं होतं प्रपोज, धर्मेंद्र यांनी असा घेतला होता बदला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 12:55 IST

Sanjeev Kumar Proposed Hema Malini: धर्मेंद्र आणि हेमा यांच्याशी संबंधित हा किस्सा 'शोले' सिनेमावेळचा आहे. त्यावेळी धर्मेंद्रच नाही तर बॉलिवूडचा एक मोठा स्टार हेमाच्या प्रेमात वेडा झाला होता.

Sanjeev Kumar Proposed Hema Malini: ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी (Hema Malini) अशा अभिनेत्रींपैकी होती जिच्यावर लोक जीव ओवाळत होते. अनेक स्टारही तिच्या प्रेमात पडले होते. पण तिने बॉलिवूडचे ही मॅन धर्मेंद्र यांना आपला जीवनसाथी निवडलं. दोघांची जोडी आज बॉलिवूडमध्ये सगळ्यात फेमस जोड्यांपैकी एक आहे. त्यांची जोडी ऑन ऑफ स्क्रीनचं नाहीतर ऑफ स्क्रीनही भारी आहे. दोघांनी अनेक सिनेमात सोबत काम केलं. अशात त्यांच्या आयुष्यातील एक खाजगी किस्सा फार फेमस आहे. 

धर्मेंद्र आणि हेमा यांच्याशी संबंधित हा किस्सा 'शोले' सिनेमावेळचा आहे. त्यावेळी धर्मेंद्रच नाही तर बॉलिवूडचा एक मोठा स्टार हेमाच्या प्रेमात वेडा झाला होता. मडिया रिपोर्ट्सनुसार, जितेन्द्रपासून ते संजीव कुमार आणि राज कुमारही हेमाला पसंत करत होते. त्यांना तिच्यासोबत लग्न करायचं होतं. जितेन्द्र आणि हेमाचं लग्न होता होता राहिलं. इतकंच नाही तर संजीव कुमार यांनी तिला लग्नासाठी विचारलं होतं.

संजीव कुमार यांनी हेमाला केलं होतं लग्नासाठी प्रपोज

संजीव कुमार यांनी हेमाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. पण ते काही शक्य झालं नाही. रिपोर्ट्सनुसार, संजीव आणि हेमा यांच्या लग्नाची चर्चाही झाली होती. पण संजीव कुमार यांच्या आईची इच्छा होती की, तिने लग्नानंतर सिनेमात काम करू नये. अशात पुढे जाऊन हेमा धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडली. दोघांची जवळीक वाढली आणि यादरम्यानच दोघांनी शोले सिनेमा साइन केला होता. 

संजीव कुमारवर रागावले होते धर्मेंद्र 

रिपोर्ट्सनुसार, सिनेमाच्या शूटींगदरम्यान संजीव कुमार यांनी हेमाला लग्नासाठी दुसऱ्यांदा विचारलं होतं. धर्मेंद्र यांना जसं हे समजलं ते संतापले होते. असं सांगितलं जातं की, संजीव कुमार यांचा सूड घेण्याचं धर्मेंद्र यांनी ठरवलं. आणि शोलेमधील तो सीन कट केला ज्यात संजीव आणि हेमा सोबत होते. झालंही तसंच दोघेही सिनेमात सोबत दिसले नाहीत.

टॅग्स :हेमा मालिनीसंजीव कुमारधमेंद्र