Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nargis-Raj Kapoor: २० मिनिटे नर्गीस यांच्या हील्सकडे बघत होते राज कपूर, म्हणाले होते - मी समजून गेलो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 12:59 IST

Nargis-Raj Kapoor Love Story: राज कपूर यांची उंची ५ फूट ७ इंच होती त्यामुळे पार्टी किंवा कोणत्याही इव्हेंटमध्ये जेव्हा नर्सीग राज कपूरसोबत राहत होत्या तेव्हा हील्स घालत नव्हत्या.

Nargis-Raj Kapoor Love Story: नर्गीस (Nargis) आणि राज कपूर (Raj Kapoor) यांची प्रेम कहाणी सर्वांनाच माहीत आहे. पण कमीच लोकांना माहीत आहे की, नर्गीस यांनी राज कपूर यांच्यामुळे हील्स घालणं सोडलं होतं. नर्गीस आणि राज कपूर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. राज कपूर यांची उंची थोडी कमी होती. हेच कारण होतं की, नर्गीस हील्स घालत नव्हत्या. जेणेकरून त्या राज कपूरपेक्षा उंच दिसू नये. रिपोर्ट्सनुसार, राज कपूर यांची उंची ५ फूट ७ इंच होती त्यामुळे पार्टी किंवा कोणत्याही इव्हेंटमध्ये जेव्हा नर्सीग राज कपूरसोबत राहत होत्या तेव्हा हील्स घालत नव्हत्या.

राज कपूर-नर्गीसची लव्हस्टोरी

राज कपूर विवाहित होते आणि नर्गीसला त्यांच्यासोबत लग्न करायचं होतं. पण राज कपूर यांना आपल्या पत्नीपासून वेगळं व्हायचं नव्हतं. याच कारणाने नर्गीस यांनी राज कपूरपासून वेगळं होणं ठीक समजलं. पण एकदा नर्गीस यांचे हील्स पाहून राज कपूर यांनी हे मानलं होतं की, आता तिच्या लाइफमध्ये आता माझी काही जागा नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघांचं नातं ९ वर्षे राहिलं.

हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा 'मदर इंडिया' चं शूटिंग सुरू होतं. तेव्हा नर्गीस सुनील दत्तच्या जवळ येत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार एकदा राज कपूरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'एक दिवस ती मला हील्स घालून भेटण्यासाठी आली. २० मिनिटे मी फक्त तिच्या हील्सकडे बघतच राहिलो'. 

ते पुढे म्हणाले होते की, 'मदर इंडियाच्या शूटिंगवेळी तिने तिच्या ड्रायव्हरला तिच्या हील्स आणि हार्मोनियअ घेण्यासाठी माझ्याकडे पाठवलं होतं. तो राज कपूर यांना म्हणाला होता की, बीबीजीने सॅंडल्स आणि हार्मोनिअम मागवला आहे. राज कपूर म्हणाले होते की, 'मी तेव्हा समजून गेलो होतो की, आता कुणीतरी उंची जास्त असलेला पुरूष तिच्या लाइफमध्ये आला आहे'. 

टॅग्स :राज कपूरनर्गिसबॉलिवूड