Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या सायली संजीवनं हिंदी मालिकेतही केलंय काम, पण या कारणामुळं अभिनेत्री झाली रिप्लेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 11:39 IST

सायलीने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे, हे फार कमी जणांना माहिती आहे.

'काहे दिया परदेस' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. या मालिकेच्या माध्यमातून सायलीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. एक एक करत यशाची पायरी चढणाऱ्या सायलीने मालिकांसह सिनेमांमध्येही काम केलं आहे. सायलीचा बस्ता हा सिनेमा विशेष लोकप्रिय झाला. इतकंच नाही तर गोष्ट एका पैठणीची हा सिनेमाही तिचा गाजला. सायलीच्या गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.

सायलीने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. सायलीप्रमाणे असे बरेच मराठी असे कलाकार आहेत जे हिंदी मालिकांमध्ये देखील काम करतात. मात्र त्याना हिंदी सेटवरचं वातावरण फारसं पटतं असं नाही. असाच काहीसा अनुभव सायली संजीवला आला. हिंदी मालिकेच्या सेटवरचं रोज जेवण करुन तिची तब्येत बिघडली होती. यानंतर तिला या मालिकेतून रिप्लेस करण्यात आलं होतं.

सायली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान सायलीने 'सातारचा सलमान', 'एबी आणि सीडी', 'मन फकिरा', 'दाह', 'बस्ता', 'झिम्मा', 'हर हर महादेव', 'उर्मी' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :सायली संजीव