Join us
Daily Top 2Weekly Top 5

इशा केसकरने बॉयफ्रेंडच्या टी-शर्टचा केला असा वापर, तर युजर्सकडून मिळतायेत भन्नाट प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 12:26 IST

सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ईशाच बोलबाला असतो.

सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. सध्या अशीच एक सेलिब्रेटी चर्चेत आली आहे.त्याला कारणीभूत ठरला तिचा हा खास फोटो. तिच्या हॉट आणि ग्लॅमरस  लूक मुळे ती सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील. नेहमीच इशा केसकरचा  ग्लॅमरस अंदाज  कुणालाही घायाळ करतील अशा अदा तिच्या फोटोत पाहाला मिळतात. 

सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ईशाच बोलबाला असतो. नुकताच तिने फक्त टी-शर्ट घातलेला फोटो शेअर करत त्याला समर्पक अशी कॅप्शन दिली आहे. त्यात तिने लिहीले आहे की, जेव्हा तुमचा बॉयफ्रेंड हा तुमच्या उंचीहून मोठा असतो तेव्हा त्याचा असा फायदा होतो. इशा आणि ऋषी सेक्सेना हे दोघे नात्यात असल्याचे सा-यांनाच माहिती आहे त्यामुळे ऋषीचा टी-शर्टचा नाईट ड्रेस म्हणून इशाने तो परिधान केला आहे. आपली हीच उत्सुकता तिने तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे. चेह-यावरचा तिचा निखळ आनंदच  तिच्या मनातील दडलेल्या भावना व्यक्त करत आहेत. तिच्या या फोटोला काहीशा संमिश्र प्रतिक्रीया मिळत असल्या तरी काहींना मात्र हा फोटो प्रचंड आडला आहे.

तर एका युजरने भन्नाट कमेंटस करत म्हटलं आहे की, जिसका बॉयफ्रेंड मोटा उसका भी बडा नाम है, टी-शर्ट ही उठालो. चड्डी का काम है? मेरे आँगने तुम्हारा क्या काम है......तर एका युजरने म्हटले आहे की, आज टी -शर्ट ट्राय केला नेक्स टाईम पँट देखील ट्राय करा मॅडम.....मेजशीर कमेंटस देखील तिच्या या फोटोवर येत असल्याचे पाहायला मिळतायेत.

इशा जितकी मेहनत अभिनयासाठी घेते तितकीच मेहनत ती फिट राहण्यासाठी देखील. ती देखील फिटनेस फ्रिक अभिनेत्री असून नित्यनियमाने ती योगा आणि योग्य डाएट घेत स्वतःला मेटेंन ठेवते. "चित्रीकरणाच्या या बिझी शेड्युलमध्ये फिट राहण्यासाठी खूप काही करायला मिळत नाही. मात्र मला वेळ मिळतो तेव्हा मी जिमला जाते, तसेच चालायला आणि पळायला जायला मला फार आवडते. त्यामुळे मला जास्त ताजेतवाने वाटते.

टॅग्स :ईशा केसकरऋषी सक्सेना