Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री राधिका आपटे एरोब्रीजवर अडकते तेव्हा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 06:43 IST

इंडिगो कंपनीचे विमान शनिवारी सकाळी साडेआठ वाजता भुवनेश्वरसाठी जाण्यासाठी उभे होते. मात्र, सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटे झाली तरी विमानात एकाही प्रवाशाला सोडण्यात आले नाही.

मुंबई : मुंबईहून भुवनेश्वरच्या विमानात जाण्यासाठी शनिवारी सकाळी अभिनेत्री राधिका आपटे निघाली खरी, पण विमान कंपनीच्या तांत्रिक चुकीमुळे तिच्यासह अनेक प्रवासी एरोब्रीजमध्ये कोंडले गेले. किमान दीड तास हे प्रवासी त्यामध्ये अडकले होते. त्या काळात त्यांना प्यायला पाणी नव्हते आणि बाथरूमचीही सोय नव्हती. यामुळे संतप्त झालेल्या राधिका आपटेने या घटनेचा व्हिडीओ चित्रीत करत तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यानंतर जाग आलेल्या इंडिगो कंपनीने अखेर झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

इंडिगो कंपनीचे विमान शनिवारी सकाळी साडेआठ वाजता भुवनेश्वरसाठी जाण्यासाठी उभे होते. मात्र, सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटे झाली तरी विमानात एकाही प्रवाशाला सोडण्यात आले नाही. विमानाच्या काउंटरवरील कर्मचारी काहीही समस्या नसल्याचे सांगत होते, मात्र तरीदेखील विमानात सोडत नव्हते. त्यानंतर १० वाजून ५० मिनिटांनी जेव्हा विमानाचे बोर्डिंग सुरू झाले आणि प्रवासी एरोब्रीजवरून विमानात प्रवेश करू लागले, त्यानंतर अचानक विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एरोब्रीज बंद करून टाकला होता. 

टॅग्स :राधिका आपटे