Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिली पत्नी रिना दत्ताच्या प्रेमात इतका वेडा झाला होता आमिर खान, रक्ताने लिहिलं होतं पत्र, त्यानंतर घटस्फोट घेत झाला वेगळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 13:08 IST

आमिर खान आणि रिना दत्ताने १९८६ साली लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली होती.लग्नावेळी आमिरा कयामत से कयामत तक सिनेमाचे शूटिंग करत होता तर रिना शिकत होती.

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान. जगाच्या कानाकोप-यात आमिरचे चाहते आहेत. त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची त्याच्या चाहत्यांना ईच्छा असते. आमिर खानसोबत काम करण्याचे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. फिल्मी करिअरमुळे जितका तो चर्चेत असतो तितकाच खासगी कारणामुळेही तो चर्चेत असतो. मुळात आमिर खानला त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलायला आवडत नाही. 

(Also Read: बॉलिवूडमधली मोठी घडामोड; आमिर खान - किरण रावचा घटस्फोट, १५ वर्षांचं नातं संपुष्टात )

आमिर खानचे पहिले लग्न रिना दत्तासह झाले होते. आमिरचे रिनावर प्रचंड प्रेम होते. आमिर रिनाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्याने चक्क रक्ताने रिनाला चिठ्ठी लिहीली होती. आमिर खानचे असे वागणे रिनाला अजिबात आवडले नव्हते. यापुढे तो असे काहीही करणार नसल्याची ताकीदच आमिरला तिने दिली होती.

 बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यापूर्वीच आमिर खान रिनाच्या प्रेमात पडला होता. रिना आणि आमिरचा धर्म वेगळा असल्याने लग्नात प्रचंड अडचणीही आल्या होत्या. अखेर कुटुंबाच्या विरोधात जात त्यांनी लग्न केले. एकमेकांच्या आकंत प्रेमात बुडालेल्या आमिर आणि रिनाने १९८६ साली लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली होती. लग्नावेळी आमिर 'कयामत से कयामत तक' सिनेमाचे शूटिंग करत होता तर रिना शिकत होती.

आमिर खानने लग्न  झाल्याचे त्याच्या कुटुंबात सांगितले तेव्हा सून म्हणून रिनाचा स्विकारही केला.तिच्यापासून आमिरला इरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. रिना दत्ता आणि आमिर खानचा संसार फार काळ काही टिकला नाही. अखेर २००२ मध्ये रिना आणि आमिर यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेत वेगळे झाले होते.

मुळात रिना आणि आमिर खानच्या घटस्फोट होण्याला कारणीभूत ठरले ते आमिर खानचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. 'दिल चाहता है'सिनेमाच्या शूटिंगवेळी आमिर आणि प्रीती झिंटाच्या अफेअरच्या चर्चा रंगायच्या.दोघांच्याही अफेअर असल्याचे रिनाच्याही कानावर आले होते. आमिरच्या अशा वागण्याला वैतागून रिनाने आमीरपासून वेगळे राहायला लागली होती.

मात्र अफेअरच्या चर्चांवर प्रीतीने अफवा असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आमिर आणि रिना दोघांमध्ये सगळे काही सुरळीत होईल असे वाटू लागले होते. तितक्यात दोघांमध्ये तिस-याची एंट्री झाली ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती होती किरण राव. २००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. आमिरने किरणसह १५ वर्षांनंतर लग्न मोडण्याचा निर्णय घेत पुन्हा एकदा चाहत्यांना मोठा धक्काच दिला आहे. किरण राव आणि आमिर यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला असल्याचे जाहीर केले आहे.

 

टॅग्स :आमिर खान