Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुझी पत्नी काय विचार करेल?', न्यूड सीन देण्याआधी राधिका आपटेने आदिल हुसैनला विचारला होता प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 08:00 IST

अभिनेत्री राधिका आपटे पार्च्ड चित्रपटातील बोल्ड विषय आणि सीन्समुळे चर्चेत आली होती.

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे पार्च्ड चित्रपटातील बोल्ड विषय आणि सीन्समुळे चर्चेत आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन लीना यादवने केले होते. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. यातील राधिका आपटेचे न्यूड सीन्सचे क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची खूप चर्चा झाली होती. राधिकासोबत या चित्रपटात अभिनेता आदिल हुसैन मुख्य भूमिकेत होता. नुकत्याच आदिल हुसैनच्या एका मुलाखतीमुळे हा सीन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  

पार्च्डमधील न्यूड सीनबाबत राधिकाने म्हटले होते की,  त्यावेळी न्यूड सीन्स देणे माझ्यासाठी सोपे नव्हते. कारण त्यावेळी मी माझ्या बॉडी इमेजशी लढत होते. त्यामुळे स्क्रीनवर न्यूड सीन्स देणे खूप कठीण होते. पण आता मला माझ्या शरीरावर, माझ्या साईज व शेपवर गर्व आहे. आता मी हे सर्व कुठेही करू शकते. बॉलिवूडमध्ये तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल अनेक सल्ले दिले जातात. पण मी माझ्या शरीरासोबत वा चेहऱ्यासोबत काहीही करणार नाही, हे स्पष्ट सांगितले आहे.

आदिल हुसैनने मुलाखतीत सांगितले की,'राधिका आपटे आणि त्याने पार्च्डमधील सीनवर कसे काम केले.' पुढे अभिनेत्याने हे देखील सांगितले की, हा न्यूड सीन चित्रीत करण्यापूर्वी चर्चा देखील केली होती. राधिकाने कलेसमोर स्वतःला समर्पित केले आणि प्रेक्षकांनी हे समजून घ्यायला हवे.

 आदिल म्हणाला की,'मी देखील त्या सीनमध्ये न्यूड आहे. अनेकदा चित्रपट करताना अशा पद्धतीने सीन करणं जबाबदारीचे काम असते.' आदिल पुढे म्हणाला की, पुढे हे देखील म्हणालो की, माझ्या पत्नीला न्यूड सीनमुळे कोणतीच आपत्ती नाही. ती माझ्या प्रोफेशनचा आदर करते. तिला आदिलच्या संवेदनशीलतेवर पूर्ण विश्वास आहे. 

इतकेच नाही तर या न्यूड सीनपूर्वी आदिलने राधिकासोबत चर्चा केली. त्याने राधिकाला विचारले की,'तुझा बॉयफ्रेंड काय विचार करेल?' त्यावर राधिका आपटे म्हणाली की मी विवाहित आहे. यानंतर राधिकाने आदिलला विचारले होते की,'तुझी बायको काय विचार करेल?' यावर आदिलने अतिशय मनमोकळेपणाने उत्तर दिले होते की, 'माझ्या पत्नीला काहीच प्रॉब्लेम नाही. यामुळे आमच्या वैवाहिक आयुष्यावर काहीच परिणाम होत नाही.'

टॅग्स :राधिका आपटे