Join us

अग्गं बाई ! दाम्पत्याकडे आहे गुडन्यूज ?, ‘मिलिंद -अंकिता’च्या या फोटोंवर होतोय शुभेच्छाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 19:04 IST

54 वर्षीय मिलिंदने 22 एप्रिल 2018 रोजी आपल्या अर्ध्या वयाच्या अंकितासोबत अलीबागमध्ये लग्न केले होते.

सोशल मीडियावर मिलिंद सोमण आणि अंकिता या दोघांचे फोटो खूप व्हायरल होत असतात. या दोघांमध्ये खूप चांगली रोमँटीक केमिस्ट्री पाहायला मिळते. विशेष म्हणजे दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही या दोघांनी लग्न करत आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. नुकतेच या कपलने त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवसही साजरा केला. लग्नाला दोन वर्ष झाले नाही की, आपल्याकडे वेध लागतात ते बाळंतपणाचे. त्यामुळे आता अंकिता आणि मिलिंदच्या या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अंकिताच्या हातात लहान बाळ दिसते आहे. काहींना हे बाळ त्यांचेच असल्याचा संभ्रम आहे. तर काही युजर्स तुम्ही कधी गुडन्यूज देणार ? असे प्रश्न विचारत असल्याचे पाहायला मिळत आहे. अंकिताच्या हातात असलेले हे बाळ तिचे नसून तिच्या बहिणीचे आहे. अंकिताच्या बहिणीने बाळाला जन्म दिला आहे. त्यावेळी दोघांनी बाळासह काढलेला हा फोटो आहे.

 तसेच सध्या हे कपल त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत असून मिलिंदने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये सांगितले की, लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो पत्नी अंकितासोबत 130 मिनिटांत 300 मजले चढला. त्याच्या मते, अॅनिव्हर्सी फक्त एक निमित्त होते."अंकितासोबत आमच्या लग्नाच्या तिसर्‍या वर्षाच्या सुरुवातीचा आनंद साजरा करण्यासाठी 300 मजले 130 मिनिटांत चढलो. 

54 वर्षीय मिलिंदने 22 एप्रिल 2018 रोजी आपल्या अर्ध्या वयाच्या अंकितासोबत अलीबागमध्ये लग्न केले होते. त्यांचा विवाहसोहळा अतिशय खासगी होता, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि निवडक मित्र या लग्नाला उपस्थित होते. 

टॅग्स :मिलिंद सोमण अंकिता कुंवर