Join us

मलायका अरोरा पहिल्यांदाच अरबाज खानच्या घरी गेली होती तेव्हा काय झालं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 08:00 IST

When malaika arora first time went arbaaz khan home : लग्नाच्या आधी पाच वर्षांपर्यंत दोघे एकमेकांना डेट करत होते.

मलायका आणि अरबाजची लव्हस्टोरी 1993मध्ये सुरु झाली होती त्यावेळी मलायका एक पॉप्युलर व्हिजे आणि मॉडल होती. एका अॅडशूट दरम्यान दोघांची भेट झाली होती. लग्नाच्या आधी पाच वर्षांपर्यंत दोघे एकमेकांना डेट करत होते. मलायकाने अरबाजला लग्नासाठी प्रपोज केले होते. सध्या मलायका अर्जुन कपूरला तर अरबाज जॉर्जियाला डेट करतोय. 

ज्यावेळी मलायका अरबाजच्या घरी पहिल्यांदा गेली त्यावेळी संपूर्ण कुटुंबीयांनी दोघांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले होते.तिला कधीच आपण दुसर्‍या घरात असल्याचे कधीच जाणवले नाही. घरात माझ्यावर कधीही कोणाताही प्रकाराचा दबाव टाकण्यात आला नाही किंवा काहीही लादण्याचा प्रयत्न केला गेला नाही. हा खुलासा मलायकाने कॉफी विद करण या शोमध्ये केला होता.

एका मुलाखती दरम्यान अरबाज खानने मलायकासोबत झालेल्या घटस्फोटाबाबतचे दु:ख बोलवून दाखवले होते. तो म्हणाला होता की, ‘मी तब्बल २१ वर्षे हे नाते टिकवण्यासाठी प्रयत्न केलेत. पण ते टिकू शकले नाही’, अशी भावना अरबाजने व्यक्त केली. आपण कोणत्याही गोष्टीत कधीच परिपूर्ण असू शकत नाही. आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. मीदेखील २१ वर्षे आमचे नाते टिकवण्याचा प्रयत्न केला, पण ठिक आहे. यापेक्षा जास्त काळ कोणीही प्रयत्न करू शकणार नाही, असेही अरबाज म्हणाला होता.

टॅग्स :मलायका अरोराअरबाज खान