Join us
Daily Top 2Weekly Top 5

असं काय घडलं की 'अंगुरी भाभी' फेम शिल्पा शिंदेनं तोडलं तिचं लग्न, अभिनेत्रीनंच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 12:54 IST

Shilpa Shinde:अभिनेत्री शिल्पा शिंदे फक्त तिच्या प्रोफेशनल लाइफसाठी नाही तर खासगी लाइफमुळेही चर्चेत येत असते.

अभिनेत्री शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) फक्त तिच्या प्रोफेशनल लाइफसाठी नाही तर खासगी लाइफमुळेही चर्चेत येत असते. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी मालिका 'भाबी जी घर पर हैं' (Bhabiji Ghar Par Hai)मध्ये शिल्पा 'अंगूरी भाभी'च्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेमुळे शिल्पाला खूप प्रसिद्धी मिळाली. इतकेच नाही तर बिग बॉस ११ चे विजेतेपद पटकावल्यानंतरही शिल्पा चर्चेत आली होती. शिल्पा आजही सिंगल आहे. 

अभिनेत्री शिल्पाने २००९ मध्ये टेलिव्हिजनवरील अभिनेता रोमित राजसोबत एंगेजमेंट केली होती, लग्नही होणार होते. मात्र, शिल्पाने लग्नाच्या काही दिवस आधी एंगेजमेंट तोडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पाच्या जवळच्यांनी तिला समजावून सांगितले होते की लग्न करण्यासाठी हे योग्य वय आहे पण अभिनेत्री सहमत नव्हती.स्वत: शिल्पा शिंदेने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'रोमित आणि माझी खूप पूर्वी एंगेजमेंट झाली होती आणि त्यावेळी आम्ही तरुण होतो. मात्र, त्यावेळी मला लग्न करून सेटल व्हायचे नव्हते, मला करिअरमध्ये पुढे जायचे होते. त्यानंतर रोमित आणि मी वेगळे झालो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोमितपासून वेगळे झाल्यानंतर शिल्पाच्या आयुष्यात एका व्यक्तीची एंट्री झाली होती पण ते नातेदेखील संपले. असे म्हटले जाते की यानंतर शिल्पाला सिंगल राहणे जास्त योग्य वाटले आणि करिअरवर लक्ष केंद्रीत करणे.

टॅग्स :शिल्पा शिंदेभाभीजी घर पर है