Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेबो झोपण्यापूर्वी काय करते?, त्यावर पती सैफचं उत्तर ऐकून कावरीबावरी झाली करीना, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 19:59 IST

सैफ अली खान आणि पत्नी करीना कपूर यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक जोडी म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर खान. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. १६ ऑक्टोबर, २०१२ साली सैफ आणि करीना लग्नबेडीत अडकले होते. आज त्यांच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांचा एक जुना व्हिडीओ समोर आला जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. यात सैफ आणि करीना एकमेकांबद्दल बोलत आहेत. अशात सैफला एक प्रश्न विचारला गेला. ज्याचे उत्तर ऐकून करीनाही लाजली. 

या व्हिडिओत सैफला विचारलं की, झोपण्यापूर्वी करीना शेवटचं काय काम करते. त्याने आधी थोडा विचार केला नंतर करिनाने इशारा केल्यानंतर तो म्हणाला, ती झोपण्यापूर्वी टीव्ही पाहते.' नंतर पुन्हा हसत हसत मोठ्या चलाखीने तो म्हणाला, 'झोपण्यापूर्वी करीना शेवटचे काम काय करते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही.' सैफच्या या वाक्यानंतर एकच हशा पिकताना दिसतो आहे. करीनाही लाजरीबुजरी होताना दिसत आहे.

सैफ आणि करीनाचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसतो आहे.

‘टशन’ या चित्रपटाच्या सेटवर करिना व सैफ यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती.२०१२ मध्ये दोघांनीही लग्न केले. सैफ हा करिनापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे.

सैफ अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तान्हाजी नंतर आता तो जवानी जानेमन सिनेमात दिसला. या सिनेमात अलाया फर्निचरवाला आणि तब्बू प्रमुख भूमिकेत होत्या. तर करीना कपूर शेवटची गुड न्यूज चित्रपटात पहायला मिळाली. नुकतेच करीनाने लाल सिंग चड्ढाचे शूटिंग पूर्ण केले आहे. 

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान