Join us
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षांपासून या आजाराने ग्रस्त आहे प्रियांका चोप्राचा होणारा पती निक जोनास!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 12:06 IST

लग्नाची अशी धामधूम सुरू असताना प्रियांकाच्या होणाऱ्या नव-याने अर्थात निकने सोशल मीडियावर एक धक्कादायक खुलासा केला आहे.

ठळक मुद्देप्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे लग्न अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेय. येत्या १२ डिसेंबरला प्रियांका व निक जोधपूर येथे लग्नगाठ बांधणार आहेतलग्नाची अशी धामधूम सुरू असताना प्रियांकाच्या होणाऱ्या नव-याने अर्थात निकने सोशल मीडियावर एक धक्कादायक खुलासा केला आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे लग्न अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेय. येत्या १२ डिसेंबरला प्रियांका व निक जोधपूर येथे लग्नगाठ बांधणार आहेत. अलीकडे प्रियांका चोप्रा आई मधू चोप्रासोबत जोधपूरला गेली होती. येथे त्यांनी उमैद भवन आणि मेहरानगड किल्ल्यात सुुरू असलेल्या लग्नाच्या तयारीची पाहणी केली. लग्नाची अशी धामधूम सुरू असताना प्रियांकाच्या होणाऱ्या नव-याने अर्थात निकने सोशल मीडियावर एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय, निकने आपल्या आजारपणाबद्दल सांगितले आहे. निक डायबिटीजने ग्रस्त आहे. अर्थात सध्या सगळे काही नियंत्रणात आहे. खुद्द निकने सोशल मीडियावर याची माहिती दिली.

‘१३ वर्षांपूर्वी मला डायबिटीज टाईप १ असल्याचे कळले होते. मी शेअर केलेल्या फोटातील पहिला फोटो डायबिटीजचे निदान झाल्याच्या काही आठवड्यानंतरचा आहे. दुसरा फोटो आत्ताचा आहे. यात मी स्वस्थ दिसतोय. आहार नियंत्रित करणे, नियमित व्यायाम करून सतत ब्लड शुगर चेक करून डायबिटीजवर नियंत्रण मिळवले आहे,’ असे निकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्याने पुढे लिहिलेय की, आता या आजारावर मी नियंत्रण मिळवलेय. यासाठी कुटुंब आणि मित्रांचा आभारी आहे. तुमच्या जगण्याचा अंदाज कुणीही बदलवू शकत नाही. शुभेच्छांसाठी धन्यवाद.तुम्हाला ठाऊक असेलचं की, प्रियांकाही अस्थमाची रूग्ण आहे. वयाच्या पाचव्या वर्षांपासून ती अस्थमाने ग्रस्त आहे. प्रियांकानेही स्वत: या आजाराबद्दल माहिती दिली होती. ‘मी पाच वर्षांच्या वयापासून अस्थमाने पीडित आहे. माझ्या आईने माझी खूप मदत केली. अस्थमा मला माझे ध्येय गाठण्यापासून रोखू शकला नाही,’ असे तिने म्हटले होते.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास