Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानच्या घरात लगीन घाई, लेक इराची पत्रिका होतेय व्हायरल, या दिवशी घेणार सातफेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 17:02 IST

Ira Khan : आमिर खानची मुलगी इरा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लोकांना अपडेट देत असते. लेटेस्ट फोटोत तिच्या लग्नाची पत्रिका छापलेली दिसत आहे आणि ती कार्डांवर पाहुण्यांची नावे लिहित आहे. या फोटोंनंतर इरा आणि तिची बॉयफ्रेंड नुपूर यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान(Aamir Khan)ची मुलगी इरा खान (Ira Khan) भलेही चित्रपटांपासून दूर असेल, पण या स्टारकिडचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. इराने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिची बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली होती. दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर, या जोडप्याने फेब्रुवारी 2021 मध्ये इंस्टाग्रामवर त्यांचे नाते अधिकृत केले. आता दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. इंटरनेटवरूनही याची बातमी जगाला मिळाली आहे. इरा खानने तिच्या लेटेस्ट पोस्टमध्ये सुंदर डिझाइन केलेल्या लग्नाच्या कार्डचा फोटो शेअर केला आहे.

आमिर आणि त्याच्या मुलीचे चाहते या बातमीची वाट पाहत होते. मात्र, या फोटो व्यतिरिक्त अजून कशाचीही पुष्टी झालेली नाही. या फोटोमध्ये वेडिंग कार्ड दिसत आहे ज्यावर इरा पाहुण्यांची नावे लिहित आहे. आजकाल आमिर खान अभिनयातून ब्रेक घेऊन घरी बसला आहे आणि सतत सांगत असतो की त्याला आपला सगळा वेळ कुटुंबासाठी द्यायचा आहे. अशा परिस्थितीत, कौटुंबिक काळात तो आपल्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमिर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा मौन बाळगतो. मात्र त्याची लव्ह लाईफ कायम चर्चेत आहे.

सध्या आमिरने मुलीच्या लग्नावर मौन बाळगले आहे. पण इराच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. इराने या पोस्टमध्ये आणखी काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती आमिर खानची दुसरी पत्नी किरण रावला प्रेमाने मिठी मारत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत ती अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत आहे. फातिमामुळेच आमिर आणि किरण वेगळे झाले, असे मानले जाते. अशाही चर्चा आहेत की, आमिर लवकरच फातिमासोबत तिसऱ्यांदा लग्न करू शकतो. फातिमाचे वय आमिरच्या मुलीएवढे असल्याने अनेकजण यावर टीका करत आहेत. 

नुकताच आमिर आणि फातिमाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. इरा खानच्या एंगेजमेंटमध्येही फातिमा छान पोशाख घालून पोहोचली होती. दरम्यान, लोक आता इरा आणि नुपूरच्या लग्नाच्या तारखेची वाट पाहत आहेत. कार्ड छापले आहेत, पण लग्न कोणत्या तारखेला होणार आहे. आमिरच्या चाहत्यांना खात्री आहे की लवकरच त्यांना इराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत अपडेट मिळेल.

टॅग्स :आमिर खानइरा खान