Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पंचायत'मध्ये 'लौकी'ला एवढं महत्व का? अखेर सचिवजींनीच सांगितलं खास गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 12:20 IST

'पंचायत 3' ची उत्सुकता शिगेल आहे. तीनही सीझनमध्ये लौकी अर्थात दुधीची भाजी का दाखवली? याचं गुपित सचिवजींनी सांगितलंय (panchayat3, jitendra kumar)

'पंचायत 3' तीनच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. 'पंचायत' च्या नवीन सीझनच्या माध्यमातून पुन्हा एकदा सचिव, प्रधान, मंजू देवी, विकास , प्रल्हाद आणि भूषण या व्यक्तिरेखांना भेटायला प्रेक्षक उत्सुक आहेत.  'पंचायत 3' च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  'पंचायत' च्या तीनही सीझनमध्ये एक कॉमन गोष्ट पाहायला मिळाली ती लौकी. अर्थात दुधी. या लौकीचं  'पंचायत'शी कनेक्शन कसं जुळलं याचा इंटरेस्टिंग किस्सा जितू भैय्या अर्थात सचिवजींनी सांगितला आहे.

 'पंचायत'मध्ये लौकीच का? सचिवजी म्हणतात...

 हिंदुस्थान.कॉमशी बोलताना जितेंद्रला विचारण्यात आलं की, मालिकेत लौकीला इतकं महत्व का दिलं आहे. लौकी ऐवजी  दुसरी भाजी का दाखवली नाही. यावर सचिवजी अर्थात जितेंद्र कुमार म्हणाला, 'गावात लौकी अर्थात दुधी ही भाजी मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे पंचायतमध्येही लौकी दाखवण्यात आली आहे. गावात सहज उपलब्ध होणारी ही एकमेव भाजी आहे. या व्यतिरिक्त प्रत्येकजण लौकी खातात आणि ती सर्वांसाठी चांगलीही असते. त्यामुळे मालिकेत फक्त लौकीच दाखवण्याचा आमचा निर्णय होता. इतर भाजीसाठी आमचा कोणताही विरोधात नाही.

'पंचायत 3' कधी पाहायला मिळेल?

'पंचायत 3'बद्दल बोलायचं झालं तर, यावेळच्या वेबसिरीजमध्ये 'पंचायत' निवडणुका आणि या निवडणुकीसाठी गावात काय वातावरण आहे आणि बनारकस म्हणजेच भूषण शोमध्ये कोणते रंग भरणार हे पाहायला मिळणार आहे. दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित 'पंचायत 3' 28 मे रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. जितेंद्र कुमार,  रघुवीर यादव, नीना गुप्ता या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टॅग्स :जितेंद्रपंचायत समितीअ‍ॅमेझॉनवेबसीरिज