Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकास कुमारने 'आर्या २'च्या सेटवरील सुष्मिता सेनसोबतचा अविस्मरणीय किस्सा केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 19:37 IST

सुष्मिता सेन अभिनीत आर्याचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सुष्मिता सेन अभिनीत आर्याचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रेलर पाहताना एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो - 'आर्या सरीन तिच्या भूतकाळापासून दूर पळून जाण्यात यशस्वी होईल की तिचे स्वतःचे कुटुंब पुन्हा एकदा तिचा विश्वासघात करेल? डिस्नी+ हॉटस्टार, एंडेमोल शाईन इंडिया आणि राम माधवानी फिल्म्स आर्याचा दुसरा सीझन सादर करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. यामध्ये सुष्मिता सेन एका अनिच्छुक गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. राम माधवानी यांच्याद्वारे भारतासाठी निर्मित, ही मालिका एनएल फिल्मने (बनिजय ग्रुप) बनवली असून, पेनोझा या हिट डच मालिकेचे अधिकृत रूपांतर आहे. आर्या २ वेबसीरिज १० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आर्या २ च्या शूटिंगदरम्यानचे अनुभव शेअर करताना विकास कुमार म्हणाला की, "राम आणि सुश्मिता हे अतिशय दयाळू आणि अत्यंत व्यावसायिक आहेत. दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून राम आणि सह-अभिनेता म्हणून सुष्मिता, तुमचा अभिनय उत्तम होण्यासाठी खूप मदत करतात. यापेक्षा तुम्हाला आणखी काय हवे असते? मी त्याच्यासोबत काम करायला नेहमीच तत्पर असेन."

विकास पुढे म्हणाला की, "रामचे दिग्दर्शन 'अदृश्य' असते. ते आपल्या अभिनेत्यांना क्वचितच 'सूचना' देतात. या सीझनमध्ये, जेव्हा आम्ही शेवटच्या शॉटसाठी शूटिंग करत होतो, तेव्हा पहिल्या टेकनंतर, जो सर्वांना आवडला होता, राम, माझ्याजवळ आले आणि अगदी नम्रपणे मला म्हणाले, 'चांगले होते, पण यावेळी रागवण्याऐवजी, कदाचित तुम्ही दुखावल्याचे भाव दाखवू शकता'. बस्स एवढेच. आणि मग यातून जे बाहेर आले ते अधिक प्रभावी होते आणि तेच फायनल एडिट म्हणून ठेवले."सुष्मिताबद्दल सांगताना त्याने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, “सुष्मितासोबतची एक घटना जी मी कधीच विसरणार नाही ती ऑफसेट घटना आहे. एक दिवस थकवणाऱ्या शूटिंग शेड्यूल नंतर, आमच्या एका पार्टीदरम्यान, सुष्मिता मला तिच्या 'मैं हूं ना' या गाण्यातल्या काही डान्स स्टेप्स शिकवत होती. आणि मी साक्षात सुश्मितासोबत डान्स स्टेप्स करत होतो आणि मी पूर्ण अवाक होतो! मी तिथे उपस्थित क्रू सदस्यांना म्हणालो, "मी सुष्मिता सेनसोबत अक्षरशः नाचत आहे... कोणीतरी हे रेकॉर्ड तर करा यार!" सुष्मिता मला म्हणाली, "खान सर! माझ्या डोळ्यात बघा, हा क्षण वाया घालवू नका!" बस्स! त्यानंतर मात्र नाचणे शक्यच नव्हते!"सुष्मिता सेन आर्या सरीनच्या जबरदस्त भूमिकेत दिसणार असून तिच्यासोबत सिकंदर खेर, विकास कुमार, मायो साराव, अंकुर भाटिया, आकाश खुराना, दिलनाज इराणी हे मुख्य भूमिकेत पहायला मिळतील.

टॅग्स :सुश्मिता सेन