Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द ट्रेटर्स'ची विजेती ठरली उर्फी जावेद, म्हणते- "बिग बॉसनंतर वाटलं नव्हतं की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:40 IST

लोकप्रिय ठरलेला ‘द ट्रेटर्स’ या रिएलिटी शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या शोच्या फिनालेमध्ये उर्फी जावेदने तिच्या शानदार खेळाने सगळ्यांची मने जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर केली.

नेहमीच चर्चेत असलेला आणि लोकप्रिय ठरलेला ‘द ट्रेटर्स’ या रिएलिटी शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या शोच्या फिनालेमध्ये उर्फी जावेदने तिच्या शानदार खेळाने सगळ्यांची मने जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर केली. विजयानंतर उर्फीने सोशल मीडियावर आपल्या 'बिग बॉस'पासून ते 'द ट्रेटर्स'पर्यंतच्या प्रवासाला उजाळा दिला. तिने एक खास व्हिडिओ शेअर केला ज्यात करण जोहर आधी बिग बॉसमध्ये तिचे नाव जाहीर करत आहे आणि आता 'द ट्रेटर्स'ची विजेती घोषित करत आहे.

उर्फी म्हणते, “बिग बॉस नंतर द ट्रेटर्स जिंकणे हा प्रवास सोपा नव्हता. कित्येकदा रडले, कित्येकदा वाटले आता होणार नाही, पण थांबायला कधीच शिकले नाही. लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही. कदाचित युनिव्हर्सला माहिती होतं ही विजय माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. बिग बॉस नंतर वाटलं होतं आता काही चांगलं होणार नाही. त्या वेळी मित्रांकडून उधार घेऊन कपडे घेतले होते. माहित नव्हतं ते उधार कधी फेडेन. पण स्वतःवर विश्वास ठेवला. लोक नेहमीच शंका घेत राहिले, आजही घेतात, पण त्याचा मला काही फरक पडला नाही. द्वेष कधीच थांबवू शकला नाही आणि पुढेही थांबवू शकणार नाही. मी तीन ट्रेटर्स बाहेर केले, हे फक्त नशिब नव्हते, ती माझी रणनीती होती. शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिले.”

द ट्रेटर्स मध्ये उर्फी जावेदने आपल्या बिनधास्त शैलीने आणि आत्मविश्वासाने सगळ्यांची मने जिंकली. तिने हा खेळ आपल्या पद्धतीने खेळला आणि मेहनतीने विजय मिळवला. करण जोहर या शोचं सूत्रसंचालन करत होता. अॅमेझॉन प्राइमवर याचा पहिला सीझन उपलब्ध आहे. 

टॅग्स :उर्फी जावेदटिव्ही कलाकार