Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मगलर्सचा खेळ खल्लास! 'तस्करी' वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित, इमरान हाशमी कस्टम अधिकाऱ्याच्या भूमिकेत, अमृता खानविलकरही झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:56 IST

'द स्मगलर वेब' सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी मुख्य भूमिकेत आहे. इमरान या सीरिजमध्ये कस्टम अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. इमरानसोबत या वेबसीरिजमध्ये मराठमोळी अमृता खानविलकरही मुख्य भूमिकेत आहे. नुकतंच 'द स्मगलर वेब'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

'धुरंधर' सिनेमानंतर देशावर आधारित असलेली 'तस्करी: द स्मगलर वेब' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सीरिजमधून देशातील कस्टम विभागाच्या कामगिरीबद्दल भाष्य करण्यात येणार आहे. 'तस्करी: द स्मगलर वेब' सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी मुख्य भूमिकेत आहे. इमरान या सीरिजमध्ये कस्टम अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. इमरानसोबत या वेबसीरिजमध्ये मराठमोळी अमृता खानविलकरही मुख्य भूमिकेत आहे. नुकतंच 'तस्करी: द स्मगलर वेब'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

'तस्करी: द स्मगलर वेब'च्या टीझरमध्ये सुरुवातीलाच इमरान हाशमीची कस्टम अधिकाऱ्याच्या वेशातील पाठमोरी झलक दिसत आहे. त्यानंतर मुंबई विमानतळावरचं दृश्य दिसत आहे. "जिथे जिथे ट्रॅव्हल आणि बिझनेस होतो तिथे तिथे तस्करीही होते. तस्करी म्हणजे स्मगलिंग...कित्येक वर्षांपासून स्मगलर्स आणि आमच्यात लपाछुपीचा खेळ सुरू आहे. कधी ते जिंकतात तर कधी आम्ही... आम्ही कोण? तर आम्ही म्हणजे सीमाशुल्क अधिकारी.... जगातील तस्करी करणाऱ्यांचं सगळ्यात वाईट स्वप्न आहोत", असं इमरान हाश्मीच्या आवाजात ऐकू येत आहे. या टीझरमध्ये तस्करी करणारे आणि कस्टम अधिकारी यांच्यातील काही सीन्स दिसत आहे. 

'तस्करी: द स्मगलर वेब' ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. १४ जानेवारीपासून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये इमरान हाशमी, अमृता खानविलकर, शरद केळकर, नंदिश संधू, झोया अफ्रोज, अनुजा साठे, अक्षया नाईक हे कलाकार झळकणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Smugglers' game over! 'Taskari' web series teaser released.

Web Summary : Imran Hashmi stars as a customs officer in 'Taskari: The Smuggler Web,' a series highlighting the Customs Department's work. Amruta Khanvilkar also plays a key role. The series premieres January 14th on Netflix.
टॅग्स :इमरान हाश्मीअमृता खानविलकर