Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळीच्या 'मिसमॅच ३'चं शूटिंग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 20:02 IST

Mismatched 3: आजवर बऱ्याच वेब सिरीजनी प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. 'मिसमॅच' ही त्यापैकीच एक वेब सिरीज आहे. याचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आजवर बऱ्याच वेब सिरीजनी प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. 'मिसमॅच' ही त्यापैकीच एक वेब सिरीज आहे. याचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाट्यमय घडामोडींचा समावेश असलेल्या 'मिसमॅच ३'( Mismatched 3)मध्ये प्रेम, मैत्री आणि स्वत्वाचा शोध घेणारं कथानक पाहायला मिळेल. यात रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी ही जोडी दिसणार आहे. दोघांनी साकारलेले ऋषी आणि डिम्पल पुन्हा प्रेक्षकांना खुणावणार आहेत. 

या वेब सिरीजचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झाल्याचं सोशल मीडियाद्वारे घोषित करण्यात आलं आहे. आकर्ष खुराणा आणि निपुण धर्माधिकारी यांनी 'मिसमॅच ३'चं दिग्दर्शन केलं आहे. आधुनिक नातेसंबंधांच्या गुंतागुंतीतून मार्ग काढणारी ही वेब सिरीज संस्कृती-परंपरा, सहचर्य आणि वैयक्तिक उत्क्रांती यावर भाष्य करणारी आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात 'मिसमॅच ३' रिलीज होणार आहे.

प्राजक्ता आणि रोहित दोघेही चित्रपटसृष्टीत आपली छाप पाडण्यात व्यग्र आहेत. प्राजक्ताने अलीकडेच २०२२ मध्ये वरुण धवन आणि कियारा अडवाणी स्टारर 'जुग जुग जीयो'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नंतर जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या विद्या बालनच्या नियतमध्ये ती दिसली. दरम्यान, रोहितचा नवीन प्रोजेक्ट विक्रम वेधा होता, ज्यामध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत होते. मिसमॅच्ड सीझन ३ चे शूटिंग आता पूर्ण झाले आहे. यात रोहित व्यतिरिक्त पश्मिना रोशन, जिब्रान खान आणि नायला ग्रेवाल देखील दिसणार आहेत.