Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फोर मोर शॉट्स प्लीज!'चा शेवटचा सीझन, या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:46 IST

बहुचर्चित वेबसीरिज 'फोर मोर शॉट्स प्लीज' (Four More Shots Please)च्या अंतिम सीझनची वाट पाहत असलेल्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सीरिजच्या शेवटच्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.

बहुचर्चित वेबसीरिज 'फोर मोर शॉट्स प्लीज' (Four More Shots Please)च्या अंतिम सीझनची वाट पाहत असलेल्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सीरिजच्या शेवटच्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. सयानी गुप्ता, कीर्ती कुल्हारी, बानी जे आणि मानवी गागरू अभिनीत या सीरिजचा आनंद प्रेक्षकांना याच महिन्यात घेता येईल.

आंतरराष्ट्रीय एमी-नामांकित सीरिज 'फोर मोर शॉट्स प्लीज' जगभरातील प्रेक्षक १९ डिसेंबरपासून पाहू शकणार आहेत. या तारखेपासून या सीरिजचा प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर होईल. नुकतेच प्राइम व्हिडीओने एक पोस्ट शेअर करून रिलीज डेटबद्दलची माहिती दिली. या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ''तुम्ही ओरिजनल गँगच्या भेटीसाठी आमंत्रित आहात.''

अंतिम सीझनची कथाया सीरिजच्या अंतिम सीझनची घोषणा यावर्षी जुलैमध्ये एका पोस्टर रिलीजसोबत करण्यात आली होती. ही सीरिज आजच्या महिलांच्या जीवनातील चढ-उतार दाखवते. सीझन ४ मध्ये शोमधील मुख्य महिला दामिनी, अंजना, सिद्दी आणि उमंग यांना हे समजणार आहे की त्यांना दुसऱ्या कोणाचे तरी नंबर वन बनण्याची गरज नाही, त्या स्वतःच आपल्या जीवनाच्या हिरो आहेत. कारण आनंद ही काही चैनीची गोष्ट नाही, तर जगण्याची एक पद्धत आहे.

सीझन ४ मध्ये दिसणार हे कलाकारयावेळी  'फोर मोर शॉट्स प्लीज'मध्ये काही नवीन चेहरे देखील दिसणार आहेत आणि शोच्या प्रसिद्ध गर्ल्स ट्रिप्स तर आहेतच. सयानी गुप्ता,किर्ती कुल्हारी, बानी जे आणि मानवी गागरू यांच्यासह लिसा रे, प्रतीक बब्बर, राजीव सिद्धार्थ, अंकुर राठी आणि मिलिंद सोमण हे कलाकार दिसणार आहेत. या सीझनचे अरुणिमा शर्मा आणि नेहा पार्टी मटियानी यांनी दिग्दर्शन केले आहे. या सीझनची पटकथा देविका भगत यांनी लिहिलेत आहेत आणि संवाद इशिता मोइत्रा यांचे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Four More Shots Please! Final Season Release Date Announced

Web Summary : The final season of 'Four More Shots Please!' premieres December 19th on Prime Video. The series, starring Sayani Gupta, Kirti Kulhari, Bani J, and Manavi Gagroo, follows four women navigating life's ups and downs, realizing they are the heroes of their own stories.