Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्वी प्रकाशने २४ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत दिले इंटिमेट सीन्स, नेटकरी झाले चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 15:43 IST

'सायको सैयां' सीरिजमध्ये तेजस्वी प्रकाशसोबत भोजपुरी आणि हिंदी विश्वातील अभिनेते रवी किशनही आहेत.

'बिग बॉस १५'ची विजेती मराठी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश 'सायको सैयां' वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. यामध्ये टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनाही आहे. काही दिवसांपूर्वी सीरिजच्या निमित्ताने मुलाखत देण्यासाठी सुरभी एकटीच आली होती. तेजस्वीने सुरभीसोबत मुलाखत देण्यास नकार दिला होता. यावरुन त्यांची कॅटफाईट चव्हाट्यावर आली होती. तसंच तेजस्वीच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेली अशीही टीका झाली. तर आता तेजस्वी सीरिजमधील इंटिमेट सीन्समुळे चर्चेत आली आहे. 

'सायको सैयां' सीरिजमध्ये तेजस्वी प्रकाशसोबत भोजपुरी आणि हिंदी विश्वातील अभिनेते रवी किशनही आहेत. तेजस्वी आणि रवी किशन यांचा एक सीन सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोघांनी यामध्ये काही इंटिमेट सीन केले आहेत. रवी किशन तेजस्वीहून २४ वर्षांनी मोठे आहेत. इतक्या मोठ्या अभिनेत्यासोबत अभिनेत्रीचे बोल्ड सीन असल्याने तेजस्वी चर्चेत आली आहे. तसंच तेजस्वी पहिल्यांदाच स्क्रीनवर असे सीन देत आहे. टीव्हीवरील सोज्वळ अभिनेत्रीची इमेज आता तिने तोडली आहे.

तेजस्वीचा हा सीन पाहून नेटकरीही चकीत झाले आहेत. 'तुला या भूमिकेत पाहणं चांगलं वाटत नाही' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. 'तेजू ये क्या है, करण देख रहा होगा' अशी खोचक कमेंटही एकाने केली आहे. 'तेजस्वी इतकी चांगली अभिनेत्री आहे मग अशा भूमिका करण्याची काय गरज?' असं एका चाहत्याने विचारलं आहे.

तेजस्वी प्रकाश खऱ्या आयुष्यात करण कुंद्राला डेट करत आहे. दोघंही बिग बॉसमध्ये एकत्र होते तेव्हापासून ते डेट करत आहेत. करण आणि तेजस्वीमध्ये ८ वर्षांचं अंतर आहे. तसंच करणचे याआधी अनेक अफेअर्स चर्चेत होते ज्यामुळे तो सतत ट्रोल झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tejasswi Prakash's intimate scenes with senior actor spark online buzz.

Web Summary : Tejasswi Prakash's intimate scenes with Ravi Kishan, 24 years her senior, in 'Psycho Saiyaan' have gone viral. This marks a departure from her usual TV persona, surprising viewers. Netizens reacted with shock and mixed opinions, some disapproving of her bold role.
टॅग्स :तेजस्वी प्रकाशरवी किशनवेबसीरिजव्हायरल व्हिडिओसोशल मीडियाट्रोल