Join us

वाघीण येतेय...!! सुश्मिता सेन करणार अंतिम वार, 'आर्या ३'चा दमदार ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 19:15 IST

Aarya 3 Trailer : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची बहुचर्चित वेबसीरिज आर्या चाहत्यांना खूप आवडली होती. आर्याच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता 'आर्या ३' सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन(Sushmita Sen)ची बहुचर्चित वेबसीरिज आर्या चाहत्यांना खूप आवडली होती. 'आर्या'(Aarya Web Series)च्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनेत्रीचे ओटीटी पदार्पण यशस्वी ठरले. यासोबतच सुश्मिता आणि आर्या या मालिकेच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. आर्या ३ सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अलीकडेच निर्मात्यांनी आर्या ३: द लास्ट वॉरची घोषणा केली होती, त्यानंतर आता त्याचा ट्रेलरही समोर आला आहे. ट्रेलरमध्ये सुश्मिता सेन जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. 

डिस्ने प्लस हॉटस्टारच्या सोशल मीडिया पेजवर आर्या ३चा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. ट्रेलर शेअर करत लिहिले की, 'एक शेवटच्या वेळी, शेरनी शेवटचा वार करेल. अंतिम वार ९ फेब्रुवारीपासून प्रसारीत होईल. 'आर्या ३' चे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. इतकंच नाही तर तो या मालिकेचा लेखकही आहे. आर्यामध्ये सुश्मिता सेनशिवाय चंद्रचूड सिंग, सिकंदर खेर, नमित दास, मनीष चौधरी, सुगंधा गर्ग हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

आंतरराष्ट्रीय एमी नामांकित वेब सिरीज आर्या आपल्या सर्वात घातक चालीसह, आर्या शेवटचा अटॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या पात्राबद्दल बोलताना सुष्मिता सेन म्हणाली, “हे सर्व सुरू झाले जेव्हा आर्याचे कुटुंब तोडण्यात आले, त्यानंतर ती व्यवसायाची निडर शेरनी बनली आहे. आता खेळाच्या पलीकडे न्यायाची बाब आहे. आर्या सरीनच्या नशिबात काहीही असो, ती निर्धाराने आणि कोणत्याही भीतीशिवाय तोंड देते. पडद्यावर आर्या सरीन ही व्यक्तिरेखा साकारल्याने मला अशा वेळी बळ मिळाले जेव्हा मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हते. त्यांच्या व्यक्तिरेखेद्वारे मी एक कलाकार म्हणून स्वत:ला शोधू शकलो.

टॅग्स :सुश्मिता सेन