Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचं अपहरण, बायकोची गद्दारी अन्...; रितेशची नवी वेब सीरिज 'विस्फोट'चा ट्रेलर; प्रिया बापटच्या 'बोल्डनेस'ने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 16:10 IST

प्रिया बापट आणि रितेश देशमुख पहिल्यांदाच एकत्र, 'विस्फोट' वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

सध्या 'बिग बॉस मराठी'मुळे अभिनेता रितेश देशमुख चर्चेत आहे. या पर्वाचं तो होस्टिंग करत आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश सदस्यांची शाळा घेताना दिसतो. त्याचं सर्वत्र कौतुकही होत आहे. आता रितेश नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'विस्फोट' या नव्या वेब सीरिजमधून रितेश प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सीरिजमध्ये रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असून प्रिया बापटही त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

'विस्फोट' या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये रितेश आणि प्रियाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. रितेशची पत्नी दाखवलेल्या प्रियाचं अफेअर असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यानंतर रितेश आणि प्रियाच्या मुलाला किडनॅप केल्याचं पाहायला मिळत आहे. एका जॅकेटमुळे फरदीनचं आयुष्यही उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे. नात्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला रितेश आपल्या मुलाला सुखरूप वाचवू शकेल का? हे पाहणं रंजनकारक असणार आहे. 

रितेश देशमुखचा या वेब सीरिजमध्ये वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. 'विस्फोट' वेब सीरिजमध्ये रितेश एका पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच रितेश आणि प्रिया बापट एकत्र काम करणार आहेत. 'विस्फोट'च्या ट्रेलरमध्ये प्रियाच्या बोल्ड अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही सीरिज ६ सप्टेंबरला जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :रितेश देशमुखप्रिया बापटवेबसीरिज