Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मेड इन हेवन २'मध्ये झळकणार पुलकित सम्राट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 17:46 IST

Made In Heaven 2 : 'मेड इन हेवन'च्या दुसऱ्या सीझनची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

मेड इन हेवनच्या दुसऱ्या सीझनची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या सीरिजच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. जोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सीरिजच्या पहिल्या भागाला चाहत्यांची पसंती मिळाली होती. आता दुसऱ्या भागाचा ट्रेलर पाहून चाहते आणखी उत्सुक झाले आहेत. मेड इन हेवन २ची सगळेच प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट बघत आहेत. यात अभिनेता पुलकित सम्राट खास भूमिका साकारणार आहे. 

मेड इन हेवनच्या पहिल्या सीझनने चाहत्यांना प्रभावित केल्यानंतर पुलकित सम्राट दुसऱ्या सीझनसाठी सज्ज झाले असून आता त्याच्या भूमिकेसाठी चाहते उत्सुक असल्याचे कळते आहे. दुसऱ्या सीझनमध्ये कोणते नवीन ट्विस्ट येणार? पुलकित कोणत्या नव्या अंदाजात दिसणार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मेड इन हेवन २ची चर्चा जोरात सुरू असताना, चाहत्यांना फुकरे ३ मधील पुलकित सम्राटच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुकता आहे.

'मेड इन हेवन' सीरिजचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव, नीरज घायवान, नित्या मेहरा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी केले आहे. या सीरिजची निर्मिती झोयाचा भाऊ आणि अभिनेता फरहान अख्तर आणि रितेश साधवानी यांच्या एक्सेल मीडिया आणि एंटरटेनमेंटने झोया आणि रीमा यांच्या टायगर बेबी प्रॉडक्शन हाऊसच्या सहकार्याने केली आहे. दिल्लीच्या पार्श्‍वभूमीवर, या शोमध्ये शहरात आयोजित भारतीय विवाहसोहळ्यांची भव्यता अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आली आहे. या मालिकेसाठी अभिनेत्री शोभिता धुलिपालाचे खूप कौतुक झाले आणि आता तिच्यासोबत मोना सिंग आणि इश्वाक सिंग हे देखील नवीन कलाकार म्हणून दिसणार आहेत.