'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा हिची ओळख आता फक्त बॉलिवूडपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. हॉलिवुडमध्येही तिने आता तिचं स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे. प्रियंकाच्या बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय वेबसीरिज 'सिटाडेल'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात पुन्हा एकदा प्रियंकाचा 'नादिया' हा एजंट अवतार पाहायला मिळत आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडीओची सर्वात यशस्वी सीरिज मानल्या जाणाऱ्या 'सिटाडेल'चा दुसरा सीझन पहिल्यापेक्षा अधिक थरारक असणार आहे.
ट्रेलरमध्ये यावेळी शत्रू अधिक शक्तिशाली आणि धोकादायक असल्याचे दाखवण्यात आले आहे. एक अत्याधुनिक मशीन मानवी मनावर कसे नियंत्रण मिळवू शकते, ही यावेळच्या कथेची मुख्य थीम आहे. स्टॅनली टुची (बर्नार्ड ऑरलिक) कडे यावेळी एक नवीन टीम आहे, मात्र जगावर घोंघावणारा धोका इतका मोठा आहे की, त्याला आपल्या जुन्या आणि सक्षम एजंट्सची म्हणजेच प्रियांका (नादिया) आणि रिचर्ड मॅडेन (मेसन केन) यांची पुन्हा मदत घ्यावी लागते. यावेळी 'मँटिकोर' नावाच्या संघटनेने उद्ध्वस्त केलेल्या गुप्तहेर यंत्रणेला पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान या टीमसमोर असेल.
'सिटाडेल २' चा ट्रेलर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज झाला आहे. मात्र, हिंदी ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एका गोष्टीची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे प्रियंकाचा आवाज. यावेळी प्रियंकाचा आवाज दुसऱ्या कोणीतरी डब केला असल्याचे जाणवत असून, नेटकऱ्यांनी त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
कधी होणार प्रदर्शित?'सिटाडेल २' पुढील महिन्यात म्हणजेच ६ मे २०२६ रोजी जगभरात प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. भारतात ही सीरिज हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येईल.
Web Summary : Priyanka Chopra's 'Citadel 2' trailer is out! The new season promises more thrills as Nadia confronts a powerful enemy controlling minds. She reunites with Richard Madden's character to save the world. Premiering May 6, 2026, on Prime Video in multiple languages.
Web Summary : प्रियंका चोपड़ा की 'सिटाडेल 2' का ट्रेलर रिलीज हो गया है! नए सीज़न में नादिया एक शक्तिशाली दुश्मन का सामना करती है जो दिमाग को नियंत्रित करता है। दुनिया को बचाने के लिए वह रिचर्ड मैडेन के साथ फिर से जुड़ती है। 6 मई, 2026 को प्राइम वीडियो पर कई भाषाओं में प्रीमियर होगा।