Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पंचायत 3' ची रिलीज डेट जाणून घ्यायचीय? प्राईमने शेअर केलेला नवीन व्हिडीओ बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 17:06 IST

'पंचायत 3' च्या रिलीज डेटबद्दल प्राईम व्हिडीओने एक नवीन व्हिडीओ शेअर केलाय. बातमीवर क्लिक करुन वाचा काय आहे व्हिडीओत

 'पंचायत 3' ची उत्सुकता शिगेला आहे. भारतातील बहुप्रतिक्षित वेबसिरीजमध्ये  'पंचायत 3' टॉपला असेल यात शंका नाही.  'पंचायत 3' च्या माध्यमातून पुन्हा एकदा सचिव, प्रधान, भूषण, विकास आणि बनराकस अर्थात भूषण प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे.  'पंचायत' च्या आधीच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं. आता 'पंचायत 3' मध्ये काय पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे. अशातच  'पंचायत 3' च्या रिलिज डेटची चर्चा असतानाच प्राईम व्हिडीओने एक नवीन व्हिडीओ शेअर केलाय.

'पंचायत 3' चा नवीन व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत पाहायला मिळतंय की एक फ्रीज दिसतोय. त्यावर लिहिलंय की, उघडू नका. आतमध्ये 'पंचायत 3' ची रिलीज डेट आहे. पुढे कोणीतरी रिलीज डेट समजेल म्हणून फ्रीज उघडतं.  उत्सुकता चाळवली जाते. पण फ्रीजमध्ये फक्त दूधी भरलेले दिसतात. 'पंचायत' ज्या 'लोकी'साठी लोकप्रिय आहे ते फ्रीजमध्ये काठोकाठ भरलेले दिसतात. 

पुढे फ्रीजच्या प्रत्येत खणात एक चिठ्ठी दिसते. त्यावर लिहिलं असतं की,  "ट्राय कर लिया, इतना सिंपल नाही, stay tuned" असं लिहिलेलं दिसतं. अशाप्रकारे 'पंचायत 3' च्या रिलीज डेटसाठी चाहत्यांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. २०२४ ची बहुप्रतिक्षित सिरीज म्हणजे 'पंचायत 3'. या सिरीजमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टॅग्स :पंचकनीना गुप्ताअ‍ॅमेझॉन