Join us

"मला हार्ट अटॅक आलाच नव्हता, तर...", 'पंचायत' फेम आसिफ खानचा खुलासा, सांगितलं नेमकं काय झालं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:21 IST

'पंचायत' फेम अभिनेता आसिफ खानला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त होतं. उपचारानंतर आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पण, मला हार्ट अटॅक आलाच नव्हता असा खुलासा आसिफ खानने केला आहे. 

'पंचायत' फेम अभिनेता आसिफ खानला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त होतं. आसिफला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पण, मला हार्ट अटॅक आलाच नव्हता असा खुलासा आसिफ खानने केला आहे. 

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आसिफने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने हृदयविकाराचा झटका आला नसल्याचं स्पष्ट केला. आसिफ म्हणाला, "सगळ्यात आधी मला हे सांगायचं आहे की मला हार्ट अटॅक आला नव्हता. गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स हा आजार होता. याची लक्षणही हार्ट अटॅकसारखी वाटत होती. पण, आता मी पूर्णपणे ठीक आहे". 

रविवारी (१३ जुलै) आसिफ खान पूर्ण दिवसभर गाडी चालवून राजस्थानहून मुंबईत आला होता. त्यानंतर संध्याकाळी त्याच्या छातीत दुखत होतं. तो बाथरुममध्ये बेशुद्ध होऊन पडला होता. रात्री उशीरा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, त्याला हार्ट अटॅक आला नव्हता. आता आसिफला डॉक्टरांनी त्याच्या डाएटमध्ये बदल करण्यास सांगितलं आहे. त्याबरोबरच वर्कआऊटही करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.  आसिफने मिर्झापूर, पाताल लोक यांसारख्य वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. पंचायतमधील त्याने साकारलेली दामादजी ही भूमिका गाजली होती. या वेब सीरिजमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.   

टॅग्स :सेलिब्रिटीवेबसीरिज