गेल्या काही काळात ओटीटीवर सत्य घटनांवर बेतलेल्या सीरिज पाहायला मिळत आहेत. अशीच एक ५ भागांची सीरिज नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालतेय. विशेष म्हणजे ही सीरिज प्रदर्शित होऊन एक महिना उलटला असला तरीही प्रेक्षकांमध्ये या सीरिजची चर्चा पाहायला मिळतेय. विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांना ही सीरिज प्रचंड आवडली आहे. खास बाब तर ही आहे की या सीरिजला IMDb वर ८.२ इतके रेटिंग मिळाले आहे.
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजचं नाव आहे 'हॅलो किड्स' (Hello Kids). ही सीरीज प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'हॅलो किड्स' ही सीरीज भारतातील लोकप्रिय शिक्षक आणि उद्योजक अलख पांडे यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
पाच भागांच्या या सीरीजमध्ये अलख पांडे आणि त्यांच्या टीमने शून्यातून 'फिजिक्सवाला' (Physics Wallah) हे साम्राज्य कसे उभे केले, याचा रंजक प्रवास दाखवण्यात आला आहे. या सीरीजचे दिग्दर्शन अभिषेक यादव यांनी केले असून अभिनेता विनीत कुमार सिंग याने अलख पांडे यांची भूमिका साकारली आहे. या सीरीजचे वैशिष्ट्य म्हणजे अलख पांडे यांच्या संघर्षासोबतच त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कथाही यात दाखवण्यात आल्यात.
'हॅलो किड्स' ही सीरिज विनीत कुमार सिंग सोबतच विक्रम कोचर, गिरिजा ओक आणि कुणाल शर्मा यांच्या दमदार अभिनयाने अधिक प्रभावी झाली आहे. जर तुम्ही या वीकेंडला काहीतरी खास पाहण्याच्या विचारात असाल, तर 'हॅलो किड्स' हा एक उत्तम पर्याय आहे.
Web Summary : Netflix's 'Hello Kids,' based on educator Alakh Pandey's life, is a hit. The series, depicting Physics Wallah's rise, boasts an 8.2 IMDb rating and is popular among students and parents. Vinnet Kumar Singh stars.
Web Summary : नेटफ्लिक्स की 'हेलो किड्स', शिक्षक अलख पांडे के जीवन पर आधारित, एक हिट है। फिजिक्स वाला के उदय को दर्शाती यह सीरीज, 8.2 IMDb रेटिंग के साथ छात्रों और अभिभावकों के बीच लोकप्रिय है। विनीत कुमार सिंह ने अभिनय किया है।