Join us

'मिर्झापूर'च्या मुन्ना भैयाची खऱ्या आयुष्यातील पत्नी कोण? दिव्येंदु शर्माची अशी आहे लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:07 IST

दिव्येंदुच्या पत्नीवर खिळल्या नजरा, दिसते खूपच सुंदर

'मिर्झापूर' सीरिज फेम मुन्ना भैय्या म्हणजेच अभिनेता दिव्येंदु शर्मा (Divyendu Sharma). या भूमिकेने त्याला कमालीची लोकप्रियता मिळवून दिली. त्याने 'प्यार का पंचनामा','चश्मे बहाद्दूर' या सिनेमांमध्येही काम केलं. मात्र 'मिर्झापूर' त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. आता तो 'मिर्झापूर' सिनेमातही दिसणार आहे. दिव्येंदुचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं आहे. कोण आहे त्याची पत्नी?

दिवेंदु शर्माच्या पत्नीचं नाव आकांक्षा दहिया आहे. ती ज्वेलरी डिझायनर असून लाईमलाइटपासून दूर आहे. दिव्येंदु आणि आकांक्षाची ओळख कॉलेजमध्येच झाली. दोघांचे विभाग वेगळे होते मात्र त्यांच्या नशिबात एकमेकांना भेटणं लिहिलंच होतं. नजरानजर झाली मग मैत्री सुरु झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. दिव्येंदुने आकांक्षाला प्रपोज करण्यासाठी ७ वर्ष लावले होते. २०११ मध्ये प्यार का पंचनामा हा पहिला सिनेमा रिलीज झाल्यावर दिव्येंदुने आकांक्षाला लग्नाची मागणी घातली होती. २०१२ मध्ये दोघांचं अगदी साधेपणाने लग्न झालं. लग्नात केवळ जवळचे मित्र आणि नातेवाईक सामील होते. 

आकांक्षा अनेकदा दिव्येंदुसोबत त्याच्या सिनेमा, सीरिजच्या प्रीमियरला दिसते. तेव्हा एखादी अभिनेत्रीच आल्यासारखी ती सुंदर दिसते.एरवी आकांक्षा सोशल मीडियावरही जास्त अॅक्टिव्ह नसते. दिव्येंदुने पत्नीसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. दोघंही एकमेकांच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट करत असतात. 

टॅग्स :सेलिब्रिटीमिर्झापूर वेबसीरिज