Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मिर्झापूर 3' मधील गोलूचा पती 'स्लो चिता'ने अजय देवगणच्या 'मैदान'मध्ये केलंय काम; अशी जुळली दोघांची रेशीमगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 12:33 IST

'मिर्झापूर 3' मधील गजगामिनी गुप्ता अर्थात गोलूचा पती रिअल लाईफमध्ये काय करतो. हटके आहे दोघांची लव्हस्टोरी (mirzapur 3, shweta tripathi)

'मिर्झापूर 3' ची सध्या चांगलीच चर्चा आहे. 'मिर्झापूर 3' पाहून चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 'मिर्झापूर 3' मधील एक व्यक्तिरेखा पहिल्या सिझनपासून चर्चेत आहे. ती म्हणजे गजगामिनी गुप्ता उर्फ गोलू. गोलूची भूमिका साकारलीय अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने. श्वेताचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून तिचा नवरा तिच्यापेक्षा ८ वर्षांनी लहान आहे. कोण आहे श्वेताचा पती? कशी आहे त्यांची लव्हस्टोरी? जाणून घ्या.

श्वेता त्रिपाठीचा नवरा आहे तरी कोण?

श्वेता त्रिपाठीने २०१८ साली गोव्यात रॅपर चैतन्य शर्माशी लग्न केले. श्वेताचा पती चैतन्य हा इंन्स्टाग्रामवर स्लो चिता नावाने ओळखला जातो. तो प्रसिद्ध रॅपर आणि अभिनेता आहे. चैतन्यने नुकतंच अजय देवगणसोबत 'मैदान' सिनेमात अभिनय केलाय. याशिवाय त्याने आजवर अनेक कलाकारांसोबत जाहिरातींमध्ये काम केलंय. श्वेता आणि चैतन्य या दोघांची लव्हस्टोरी एकदम हटके आहे. या दोघांच्या लव्हस्टोरीतला समान धागा म्हणजे त्यांनी केलेलं थिएटर.

अशी आहे श्वेता-चैतन्यची लव्हस्टोरी

श्वेता त्रिपाठी आणि चैतन्य शर्मा या दोघांनी रंगभूमीवर काम केलंय. दिल्लीतील एका कार्यक्रमानंतर दोघेही मुंबईला जात होते. पहाटेचे पाच वाजले होते आणि ते एकमेकांच्या शेजारी बसले होते. झोपण्याऐवजी ते एकमेकांशी बोलू लागले आणि तेव्हाच त्यांच्यातील मैत्रीला सुरुवात झाली. फेसबुक मेसेंजर ते व्हॉट्सॲप आणि नंतर कॅज्युअल मीटिंग्सनिमित्ताने एकमेकांशी ते बोलू लागले. पुढे मुंबईत आल्यावर त्यांची मैत्री आणखी वाढली. आपल्या आवडीनिवडी सारख्या आहेत, अशी दोघांनाही जाणीव झाली.

असं केलं  चैतन्यने श्वेताला प्रपोज

नंतर श्वेता आणि चैतन्य दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि डेट करू लागले. कोणीतरी रोलरकोस्टर राईडवर प्रपोज करावे अशी श्वेताची इच्छा होती, तर कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत स्टेजवर कोणालातरी प्रपोज करावं असं चैतन्यला वाटत होतं. पुढे श्वेताला कोणतीही कल्पना न देता चैतन्य तिला क्लबमध्ये घेऊन गेला. त्याच क्लबमध्ये श्वेताने तिच्या मित्र आणि कुटुंबियांना पाहिले. तिला थोडेसे अस्वस्थ वाटले. पण याच ठिकाणी गुजराती अंदाजात चैतन्यने श्वेताला प्रपोज करुन लग्नाची मागणी घातली. पुढे गोव्यात त्यांनी थाटामाटात लग्न केलं

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजश्वेता त्रिपाठीपंकज त्रिपाठी