Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मिर्जापुर 3' मधून मुन्ना भैय्याचा पत्ता कट; अभिनेत्याने केलं कन्फर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 10:45 IST

Mirzapur 3: द्विवेंदू शर्मा यापुढे मिर्झापूर सीरिजमध्ये झळकणार नसून या मालिकेतून त्याचा पत्ता कट होण्यामागे मोठं कारण असल्याचं त्याने सांगितलं आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक 'मिर्झापूर 3' ची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मिर्झापूर (Mirzapur) आणि मिर्झापूर 2 हे दोन्ही पार्ट ओटीटीवर प्रचंड गाजले होते. त्यामुळे या सीरिजचा तिसरा पार्ट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यामध्येच आता या सीरिजविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल ४ वर्षाने या सीरिजचा पुढचा पार्ट प्रदर्शित होत असल्यामुळे त्याच्याविषयी नवनवीन माहिती समोर येत आहे. यामध्येच आता या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा द्विवेंदू शर्मा याचा पत्ता कट झाला आहे.

अलिकडेच द्विवेंदू शर्मा याने नुकतीच 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मिर्झापूरमध्ये त्याची भूमिका नसल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्याने सीरिजमध्ये साकारलेल्या भूमिकेचा परिणाम त्याच्या वैयक्तिक जीवनावर पडत असल्याचं त्याने म्हटलं आहे.

मिर्झापूरमधून दिव्येंदू शर्माचा पत्ता कट?

" ज्यावेळी मी मुन्ना भैय्याची भूमिका साकारत होतो त्यावेळी त्या भूमिकेचा परिणाम न कळतपणे माझ्या खासगी आयुष्यावर होत होता. आपल्याला कोणत्याही भूमिकेत इतकं समरसून जायला नकोय ज्यामुळे त्याचा परिणाम आपल्या खासगी आयुष्यावर होऊ लागेल. अप्रत्यक्षपणे त्या भूमिकेचा माझ्यावर इतका परिणाम झाला की माझं मलाच कळलं नाही. पण. ज्यावेळी तुम्ही यातून बाहेर पडता त्यावेळी तुम्हाला त्या डार्कनेसचा अंदाज येतो", असं दिव्येंदू म्हणाला.

दरम्यान, २०१८ मध्ये मिर्झापूर ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर २०२०  त्याचा दुसरा पार्ट रिलीज झाला. यामध्येच आता लवकरच त्याचा तिसरा पार्टही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा, ईशा तलवार, अली फजल हे कलाकार झळकले आहेत.

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजवेबसीरिजसेलिब्रिटीपंकज त्रिपाठी