Join us

मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठे झळकणार 'महारानी २'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 18:45 IST

Anuja Sathe: 'महारानी २'मध्ये अनुजा साठे किर्ती सिंगची भूमिका साकारणार आहे

काही कथा आपल्‍या मनावर अनोखी छाप निर्माण करतात आणि आपल्‍यामध्‍ये अधिकाधिक उत्‍सुकता निर्माण करतात. अशी एक कथा आहे सोनीलिव्‍हची सिरीज 'महारानी' (Maharani). या सिरीजने लक्षवेधक कथानकासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. प्रबळ राजकीय नेता म्‍हणून उदयास येण्‍यासाठी समाजातील पुरूषप्रधान अडथळ्यांचा सामना करणा-या प्रमुख नायिकेच्‍या अवतीभोवती केंद्रित या सिरीजच्‍या मागील पर्वाने प्रेक्षकांमध्ये अधिक उत्‍सुकता निर्माण केली. प्रेक्षकांच्‍या प्रतिक्षेचा शेवट करत ही सिरीज उत्‍साहवर्धक अशा दुसऱ्या पर्वासह परतली आहे, जेथे प्रतिभावान कलाकारांमध्‍ये अनुजा साठे (Anuja Sathe) यांचा समावेश करण्‍यात आला आहे. 

राजकीय उमेदवाराच्‍या भूमिकेत प्रवेश करत अनुजा साठे किर्ती सिंगची भूमिका साकारणार आहे, जी भीमा भारतीची (सोहम शाह) विश्‍वासू बनते. आपल्‍या भूमिकेबाबत बोलताना ती म्‍हणाली, ''मी भूमिकांसंदर्भात नेहमीच नशीबवान राहिली आहे. हाच ट्रेण्‍ड कायम राखत प्रेक्षकांना मी या सिरीजमध्‍ये नवीन अवतारात पाहायला मिळेल. किर्ती वास्‍तविक जीवनात मी जशी आहे त्‍यापेक्षा पूर्णत: विरूद्ध आहे. म्‍हणून अभिनेत्री म्‍हणून माझ्यासाठी हा उत्‍साहवर्धक व समाधानकारक अनुभव होता. मला माझ्या भूमिकेचे विविध पैलू साकारताना स्‍वत:मध्‍ये बदल करावे लागले. सर्व कलाकार व टीम अत्‍यंत सहाय्यक राहिली आहे आणि मी त्‍या सर्वांसोबत काम करताना खूप धमाल केली.''  

'महारानी २'चे दिग्‍दर्शन रविंद्र गौतम यांनी केले आहे, तर सुभाष कपूर व नंदन सिंग हे या सिरीजचे शोरनर्स व लेखक आहेत. प्रमुख भूमिकेत ह्युमा कूरेशी असलेल्‍या या सिरीजमध्‍ये सोहम शाह, अमित सियाल, विनीत कुमार, इनाम उल हक, दिब्‍येंदू भट्टाचार्य, कनी कस्‍तुरी, प्रमोद पाठक आणि विनीत कुमार हे देखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत. 'महारानी २' लवकरच सोनीलिव्‍हवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :अनुजा साठे