Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा खानच्या 'ए मेरे वतन' सिनेमात झळकला प्रसिद्ध मराठी अभिनेता, साकारली महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 13:54 IST

'ए मेरे वतन' सिनेमात सचिन खेडेकर यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. पण, सचिन खेडेकर यांच्याबरोबर आणखी एक मराठमोळा अभिनेता या सिनेमात झळकला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या 'ए मेरे वतन' सिनेमामुळे चर्चेत आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणाऱ्या उषा मेहता यांची शौर्यगाथा या सिनेमातून मांडण्यात आली आहे. ट्रेलरपासूनच या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. या सिनेमात सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे. नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला असून यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक दिसली आहे. 

सारा अली खानच्या सिनेमात अभिनेता सचिन खेडेकरही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'ए मेरे वतन' सिनेमात सचिन खेडेकर यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. पण, सचिन खेडेकर यांच्याबरोबर आणखी एक मराठमोळा अभिनेता या सिनेमात झळकला आहे. 'देवयानी' मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता संग्राम साळवी ए मेरे वतन सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. संग्रामने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सारा खानबरोबरचा फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. 

स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेत रेडिओ स्टेशन सुरू करून त्याद्वारे भारतीयांचं प्रबोधन करणाऱ्या उषा मेहता यांची कहाणी 'ए मेरे वतन' सिनेमातून मांडण्यात आली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन कन्नन अय्यर यांनी केलं आहे. २१ मार्चला हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

दरम्यान, 'ए मेरे वतन' सिनेमात साराबरोबर स्क्रीन शेअर करणाऱ्या संग्रामने अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'देवयानी' मालिकेतील त्याची भूमिका विशेष गाजली. त्याने 'कुलस्विमिनी', 'मी तुझीच रे' अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याबरोबरच 'शेर शिवराज', 'मितवा' या सिनेमांमध्येही तो झळकला आहे. सध्या संग्राम 'सन मराठी'वरील 'कन्यादान' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

टॅग्स :सारा अली खानसंग्राम साळवीमराठी अभिनेताअ‍ॅमेझॉन