Best Series On OTT: हल्ली ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना मनोरंजनाचं नवं माध्यम खुलं झालं आहे. जगभरात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या कलाकृती ते घरबसल्या पाहू शकतात. दरम्यान,लोकांमध्ये डिजीटल प्लॅटफॉर्मबद्दल क्रेझ वाढली असून सध्या क्राइम थ्रिलर जॉनर तसेर मर्डर मिस्ट्री सिनेमे पाहण्याचा प्रेक्षकांचा सर्वाधिक कल आहे. असाच एक मर्डर मिस्ट्री सिनेमा पाहून डोकं चक्रावून जाईल.
२०२४ मध्ये अनेक धमाकेदार वेब सिरीज ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आल्या. मात्र, त्यापैकी काही मोजक्याच सीरिज रसिकांच्या पसंतीस उतरल्या. त्यातीलच एक नाव म्हणजे 'किलर सूप'. या वेबसीरीजमध्ये मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळाले.याचं दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केलं आहे.याची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. तुम्ही ही सीरिज पाहायला सुरुवात केल्यानंतर स्क्रीनवरून नजर हटणार नाही. आठ एपिसोड्सची या सीरिजचा प्रत्येक भाग जबरदस्त सस्पेन्सने भरलेला आहे.
'किलर सूप' ही नेटफ्लिक्सवरील एक डार्क मर्डर मिस्ट्री वेब सिरीज आहे. ज्याचं कथानक स्वाती शेट्टी (कोंकणा सेन शर्मा) भोवती फिरते तिला एक भविष्यात शेफ बनायचं असतं. जेव्हा स्वाती शेट्टीला कळतं की तिचा नवरा प्रभाकरचं निधन झालं आहे, तेव्हा ती हुबेहूब तिच्या नवऱ्यासारख्या दिसणाऱ्या उमेशसोबत मिळून कट रचते. यामध्ये मनोज वाजपेयींची दुहेरी भूमिका आहे. याशिवाय अभिनेते सयाजी शिंदे,नासीर यांच्याही भूमिका आहेत.मृत्यूचे गूढ उलगढणारी ही सीरिज हिंदी व्यतिरिक्त तामिळ-तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये नेटफ्लिक्सवर 11 जानेवारी रोजी प्रदर्शित झाली आहे.