Join us

'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:25 IST

Manisha Koirala : मनीषा कोईरालाने 'हीरामंडी' या वेबसिरीजमध्ये इंटिमेट सीन्स दिले आहेत. ज्यावर मनीषाने आता पहिल्यांदाच आपले मौन सोडले आहे.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'हीरामंडी' (Heeramandi Web Series) या वेब सीरिजला लोकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असली तरी काही कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. यात मल्लिका जानची भूमिका करणारी मनीषा कोईराला देखील आहे. या सीरिजमध्ये मल्लिका जानचा एक इंटिमेट सीन आहे. ज्यावर मनीषाने आपले मौन सोडले आहे. मनीषाने एका मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीला हा सीन स्क्रिप्टचा भाग नव्हता.

बॉलिवूड बबल्सला दिलेल्या मुलाखतीत मनीषा कोईराला हिने तिच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि इंटीमेट सीनबद्दल सांगितले ज्याबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. मनीषा म्हणाली की, 'मी नेपाळमध्ये होते आणि बागकाम करत होते तेव्हा मला संजय लीला भन्साळींचा फोन आला. ते कॉलवर म्हणाले की मनीषा, ही तुझ्यासाठी चांगली भूमिका आहे, स्क्रिप्ट वाचून मला खूप आनंद झाला. त्यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न मी सोडून दिले होते.

मनीषाने इंटिमेट सीनवर सोडले मौन जेव्हा मनीषाला शेखर सुमनसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, 'संजय जे काही लहानसहान गोष्टी करतात, त्यात ते एक नवीन घटक आणण्याचा प्रयत्न करतात ज्याचा आम्ही विचारही केलेला नसतो. शेखर सुमन यापूर्वी या इंटिमेट सीनबद्दल बोलले होते. शेवटच्या क्षणी हा सीन बदलल्याचे त्यांनी सांगितले होते.

'हीरामंडी' वेबसीरिजबद्दलशेखर सुमनने हीरामंडी वेबसीरिजमध्ये नवाब झुल्फिकारची भूमिका साकारली आहे. त्यांचा मुलगा अध्यायन सुमन याने नवाब जोरावरची भूमिका साकारली आहे. हीरामंडी एक पीरियड ड्रामा आहे. या शोमध्ये सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल आणि फरदीन खान महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

टॅग्स :मनिषा कोईरालासंजय लीला भन्साळी