Squid Game 3: सुपरहिट कोरियन सीरिज 'स्क्विड गेम'ने जगभरात धुमाकूळ घातला. सर्वच या सीरिजचे चाहते झाले. अतिशय वेगळं कथानक, म्युझिक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे सीरिज गाजली. नेटफ्लिक्सने आता याच्या तिसऱ्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. यासोबतच रिलीज डेटचीही घोषणा केली आहे. हा सीझन सीरिजचा शेवट असू शकतो अशीही शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून चाहते याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कधी रिलीज होणार 'स्क्विड गेम ३'?
'स्क्विड गेम ३'च्या टीझर मध्ये फ्लॅशबॅक आणि आगामी कथानकाची झलक पाहायला मिळत आहे. सीझनमध्ये पुन्हा एकदा जीवघेणा खेळ सुरु होणार आहे. जुन्या कलाकारांसोबतच काही नवीन चेहरेही दिसत आहेत. टीझरमधून फारसं काही उघड करण्यात आलेलं नाही. मात्र शेवटी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे या गाजलेल्या सीरिजचा शेवट नक्की कसा होतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे. काही मिनिटातच टीझरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
कधी येणार Squid Game 3?
स्क्विड गेम सीझन २७ जुन रोजी रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच हा शो येणार आहे. सीरिजचे निर्माते ह्यांग डोंग-ह्युक म्हणाले की या सीझनमध्ये आणखी ट्विस्ट आणि इमोशन्स पाहायला मिळणार आहेत.