Join us

अर्जुन कपूरची बहीण, राज कुंद्रा ते उर्फी; करण जोहरच्या 'द ट्रेटर्स'मध्ये दिसणार 'हे' सेलिब्रिटी, ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:12 IST

विश्वास आणि फसवणुकीचा थरारक खेळ; करण जोहरच्या 'द ट्रेटर्स' या रिएलिटी शोचा ट्रेलर प्रदर्शित

ओटीटीवर लवकरच 'द ट्रेटर्स' हा नवा रिएलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द ट्रेटर्स'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. प्राइम व्हिडिओवरील या रिएलिटी शोचं सूत्रसंचालन बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर करताना दिसणार आहे. ३० हून अधिक देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या 'द ट्रेटर्स' या रिएलिटी शोचं भारतीय व्हर्जन आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये २० सेलिब्रिटींची वर्णी लागली आहे. 

राजस्थानमधील भव्य सूर्यगढ पॅलेसमध्ये घडते या शोचं शूटिंग होत आहे. स्पर्धकांना खेळात टिकून राहण्यासाठी काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. यासाठी बुद्धी चातुर्य आणि शक्तीचाही कस लागणार आहे. या शोमध्ये "निष्पाप" आणि "धोखेबाज" अशी दोन गट असतील. सूत्रसंचालक करण जोहर सुरुवातीलाच काही स्पर्धकांना "धोखेबाज" म्हणून निवडेल. ज्यांना इतर "निष्पाप" स्पर्धकांना शोमधून बाहेर काढण्याचा टास्क देण्यात येईल.

हे असतील स्पर्धक

या शोमध्ये २० सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होणार आहेत, ज्यात अन्शुला कपूर, अपूर्वा, आशिष विद्यार्थी, एलनाझ नोरौजी, हर्ष गुज्जराल, जन्नत जुबैर, जान्वी गौर, जॅस्मिन भसीन, करण कुंद्रा, लक्ष्मी मांचू, माहिप कपूर, मुकेश छाब्रा, निकिता लुथर, पुरव झा, रफ्तार, राज कुंद्रा, साहिल सालाथिया, सुधांशु पांडे, सूफी मोटिवाला आणि उर्फी जावेद यांचा समावेश आहे.

करण जोहर या शोबद्दल म्हणाला, "या शोमध्ये फसवणूक, विश्वासघात आणि नाट्यमय वळणांचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. मी या शोचे सूत्रसंचालन करताना प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव देण्याचा प्रयत्न करेन." 'द ट्रेटर्स' हा शो १२ जूनपासून प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. प्रत्येक गुरुवारी रात्री ८ वाजता या रिएलिटी शोचा नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

टॅग्स :करण जोहरउर्फी जावेदराज कुंद्राकरण कुंद्रा