Join us
Daily Top 2Weekly Top 5

हुमा कुरेशी आणि अवंतिका दासानी 'मिथ्या २'मध्ये झळकण्यासाठी सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 18:46 IST

Mithya 2 : मानसशास्त्र विषयावरील नाट्य 'मिथ्या' वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज महत्त्वाकांक्षा, विश्वासघात आणि सूड भावनेने पछाडलेल्या दोन सावत्र बहिणींमधील अशांत नात्याभोवती फिरते.

मानसशास्त्र विषयावरील नाट्य 'मिथ्या' वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज महत्त्वाकांक्षा, विश्वासघात आणि सूड भावनेने पछाडलेल्या दोन सावत्र बहिणींमधील अशांत नात्याभोवती फिरते. 'मिथ्या सीझन २' चा प्रीमियर लवकरच झी 5वर होणार आहे. या सीरिजमधून पुन्हा एकदा हुमा कुरेशी आणि अवंतिका दासानी रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

कपिल शर्मा दिग्दर्शित आणि रोझ ऑडिओ व्हिज्युअल प्रॉडक्शनच्या सहकार्याने अप्लॉज एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, मिथ्याच्या दुसऱ्या सीझनमध्ये रजित कपूर आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्या प्रमुख भूमिकांसह सावत्र बहिणी साकारणाऱ्या हुमा कुरेशी आणि अवंतिका दासानी झळकणार आहेत. या नव्याकोऱ्या सीझनमध्ये नवीन कस्तुरिया दिसणार असून, तो या दोन बहिणींच्या जीवनाला अधिक मसालेदार करणारी एक रहस्यमय व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. 

दिग्दर्शक कपिल शर्मा म्हणाला, "आम्ही आमच्या प्रेक्षकांना नवीन सीझनकडे वळवण्यासाठी पूर्णपणे उत्साही आहोत. हा सीझन केवळ कथानकांमुळेच समृद्ध नसून नेत्रदीपक देखील आहे. चित्तथरारक दार्जिलिंगवर आधारित,कथानकाची तीव्रता उंचावणारी दृश्ये आणि थरारासह प्रतिभावान कलाकारांच्या काही अद्भुत कामगिरी टिपल्या आहेत. 'मिथ्या'च्या पुनरागमनाची चर्चा प्रचंड आहे. आमच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा एक पायरी वर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” 

टॅग्स :हुमा कुरेशी