Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गुटर गु' वेबसीरिज लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 15:39 IST

गुटर गु या आगामी आधुनिक टीन रोमान्सचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पौगंडावस्थेतील प्रेमाचे अनेक पदर, बारकावे आणि सुक्ष्मता ह्या मालिकेत टिपण्यात आले आहे.

गुटर गु या आगामी आधुनिक टीन रोमान्सचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पौगंडावस्थेतील प्रेमाचे अनेक पदर, बारकावे आणि सुक्ष्मता ह्या मालिकेत टिपण्यात आले आहे. अश्लेषा ठाकूर (रितू) आणि विशेष बन्सल (अनुज) ह्यांच्या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. हे दोघे पहिल्या प्रेमाची पहाट अनुभवतात आणि त्यासोबत येणाऱ्या आव्हानांचाही सामना करतात. त्यांच्या कल्पना उघड्या पाडणाऱ्या आणि नात्यावर परिणाम करणाऱ्या समस्या व आव्हाने ह्यांवर सहा भागांच्या ह्या मालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच आईवडिलांच्या तीव्र दबावामुळे त्यांचा त्रास अधिकच कसा वाढतो हेही दाखवले आहे.

‘गुप्त-ग्यान’ जोडी रितू आणि अनुज ह्यांच्या वरकरणी एकमेकांहून वेगळ्या भासणाऱ्या पण द्राक्षाच्या वेलीप्रमाणे एकमेकांत विणल्या गेलेल्या आयुष्यांची झलक ट्रेलरमध्ये दिसत आहे. तारुण्यात पदार्पण करण्याच्या वयातील प्रणयाला अनपेक्षित घटनांमधून जावे लागल्यामुळे त्यांचे नाते अधिकच गुंतागुतींचे व उत्कट होते.

वेगवेगळे दृष्टिकोन व कौटुंबिक पार्श्वभूमींमुळे, त्यांच्या पहिल्या प्रेमाच्या अनेकविध छटा कशा उमटतात ह्याचा प्रवास बघणे, खूपच विस्मयकारक ठरणार आहे. हे वयात येण्याच्या काळातील नाट्याची निर्मिती, गुनीत मोंगा ह्यांच्या सिख्य प्रोडक्शन्स नावाच्या ऑस्कर पुरस्कारप्राप्त निर्मितीसंस्थेने, केली आहे. अॅमेझॉन शॉपिंग अॅप व फायर टीव्हीवरून दिसणाऱ्या अॅमेझॉन मिनि टीव्हीवरून ५ एप्रिलपासून ही मालिका स्ट्रीम करता येईल.