Join us

'सुष्मिता सेनला ऑस्कर द्या', 'आर्या २'च्या ट्रेलरला मिळतोय चाहत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 21:21 IST

सुष्मिता सेनची लोकप्रिय ठरलेली वेबसीरिज आर्याच्या दुसऱ्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे.

सुष्मिता सेनची लोकप्रिय ठरलेली वेबसीरिज आर्याच्या दुसऱ्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. नुकताच आर्या २चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. पहिल्या सीझनमध्ये पाहायला मिळाले की, नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती तिच्या कुटुंबाचे संरक्षण करताना दिसली होती. शेवटचा सीझन सुष्मिता सेन मुलांना देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करताना दाखवली होती. 

आता दुसऱ्या सीझनमध्ये ती पुन्हा देशात तिच्या हक्कांसाठी लढताना दिसणार आहे. पहिला सीझन पुढे काय घडणार हे सांगता येत नाही, यावर संपला होता आणि पहिल्या सीझनमधील सर्व गोष्टींची अनुत्तरीत उत्तरे दुसऱ्या सीझनमध्ये मिळतील. सुष्मिता सेनने आर्या २चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, अधिकृत ट्रेलर. तुमच्या प्रतीक्षेसाठी मी खूप आभारी आहे. आर्या पुन्हा भेटीला आणली त्यासाठी मी खूप खूष आहे. हा सीझनमध्ये तिची दुर्बलता आणि ताकद समजणार आहे. शेरनी आ रही है... आर्या इज बॅक.सुष्मिता सेनशिवाय आर्या २ या वेबसीरिजमध्ये विकास कुमार, जयंत क्रिपलानी, सिकंदर खेर, विश्वजीत प्रधान, अंकुर भाटिया, प्रत्यकाश पानवार आणि विरेन वझिरानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दुसऱ्या सीझनचा ट्रेलर पाहता यात ड्रामा, एक्शन आणि खिळवून ठेवणारे सीक्वन्स पाहायला मिळणार आहे. आर्या २चा ट्रेलरला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे आणि ते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने म्हटले की, या महिलेला अभिनयासाठी आधीच ऑस्कर आणि प्रतिष्ठित पुरस्कार द्या. लोक उत्कृष्ट कलाकृती म्हणत आहेत.

टॅग्स :सुश्मिता सेन