Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फर्जी' फेम भुवन अरोराला IMDbच्या या पुरस्काराने केलं सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 19:03 IST

'फर्जी' या वेबसीरिजमधील भुवन अरोराच्या कामाचे सर्वत्र खूप कौतुक झाले.

अभिनेता भुवन अरोराला फर्जीसाठी IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार मिळाला आहे व जगभरातील दर महिन्याला २० कोटींहून अधिक असलेल्या IMDb विजिटर्सच्या पेज व्ह्यूजद्वारे हे ठरवण्यात आले. भुवन अरोराने केलेली गुन्हेगारीवरील थ्रिलर ‘फर्जी’ मधील भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. यामध्ये त्याने फिरोजची भुमिका केली आहे जो सनीचा (शाहीद कपूर) बेस्ट फ्रेंड आणि अपराधांमधील वाटेकरी असतो. तो एक कलाकार असतो पण जेव्हा तो अगदी परिपूर्ण खोट्या नोटा बनवतो, तेव्हा तो फसवणुकीच्या अपराधामध्ये ओढला जातो.

भारतामध्ये या वर्षीच्या टॉप वेब सिरीजमध्ये हा शो ट्रेंड होतो आहे. 29 मार्च रोजी त्याचे IMDb युजर रेटिंग8.4 आहे. भारत, अमेरिका, यु.के., कॅनडा, यु.ए.ई., सौदी अरेबिया, बहारीन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आणि मलेशियासह जगभरातील अनेक देश प्रदेशांमध्ये प्राईम व्हिडिओवरील टॉप 10 टायटल्समध्ये पोहचण्याचा जागतिक पातळीवरचा सन्मानसुद्धा ह्या थ्रिलरला मिळाला आहे. अरोराने काम केलेल्या अन्य भुमिका शुद्ध देसी रोमान्स, तेवर, द टेस्ट केस आणि बँक चोर हेही आहेत. 

“फर्जीमधील माझ्या भुमिकेसाठी मला इतके प्रेम देणा-या जगभरातील चाहत्यांना व व्यावसायिकांना मन:पूर्वक धन्यवाद,” अरोराने म्हंटले. “मी अतिशय भावुक झालो आहे, अवाक आहे आणि IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय कृतज्ञ वाटत आहे. व्यक्तिगत अभिनयासाठीचा हा माझा पहिला पुरस्कार आहे आणि माझ्यासाठी तो खूप खास आहे. धन्यवाद IMDb.”