लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (emraan hashmi) याची मुख्य भूमिका असलेली 'तस्करी: द स्मगलर्स वेब’ ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. सध्या ही सीरिज ओटीटीवर लोकप्रिय ठरत आहे. या सीरिजच्या निमित्ताने इमरानने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने इंडस्ट्रीविषयी अनेक खुलासे केले. यात खासकरुन बॉलिवूडमध्ये एकी नाही असं स्पष्ट मत त्याने मांडलं. त्याच्या या वक्तव्याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
अलिकडेच इमरानने 'अमर उजाला'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या वेबसीरिजविषयी चर्चा केली. ही चर्चा सुरु असतांनाच त्याला बॉलिवूडविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे देतांना त्यांनी बॉलिवूडमधील लोकांच्या वागण्याविषयी भाष्य केलं.
'इंडस्ट्रीमध्ये एकता, एकजुटपणा नाहीये असं तुम्हाला वाटतं का?' असा प्रश्न इमरानला विचारण्यात आला. त्यावर त्याने होकारार्थी उत्तर दिलं. ''हो. खरं तर असंच वाटतं. कारण, इथे लोक पाठीमागून तुमच्याविषयी बरंच काही बोलतात. इंडस्ट्रीमध्ये एक दुसऱ्याचा पाय खेचण्याची पद्धत तर फार कॉमन आहे'', असं इमरान म्हणाला.
पुढे तो म्हणतो, ''जर इथे कोणी पुढे जात असेल तर त्याला मागे कसं खेचायचं याचा प्रयत्न केला जातो. जर माझ्याकडे नाही तर ती गोष्ट दुसऱ्याकडे तरी कशाला असावी असा विचार इथे केला जातो. आणि, हा विचार खरंच फार चुकीचा आहे.'' दरम्यान, १४ जानेवारीला 'तस्करीः द स्मगलर्स वेब' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजने केवळ भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच, या वेब सीरिजने जागतिक टॉप १० सीरिजच्या यादीमध्ये स्थान पटकावलं.
Web Summary : Emraan Hashmi's new web series is trending. In a recent interview, he criticized Bollywood's lack of unity and tendency to pull others down, sparking online discussion.
Web Summary : इमरान हाशमी की नई वेब सीरीज ट्रेंड कर रही है। एक हालिया इंटरव्यू में, उन्होंने बॉलीवुड में एकता की कमी और दूसरों को नीचे खींचने की प्रवृत्ति की आलोचना की, जिससे ऑनलाइन चर्चा छिड़ गई।