Join us

"दिग्दर्शकाने मला किस करण्याचा प्रयत्न केला अन्..." 'क्रिमिनल जस्टीस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:38 IST

नुकत्याच रिलीज झालेल्या क्रिमिनल जस्टिस ४ मधील अभिनेत्रीने दिग्दर्शकाने अश्लील वर्तन केल्याचा खुलासा करत धक्कादायक अनुभव सांगितला आहे. काय म्हणाली?

'सेक्रेड गेम्स' वेबसीरिज सर्वांच्या चांगलीच लक्षात असेल. या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री सुरवीन चावला (surveen chawla) झळकली होती. सुरवीन आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये विविध ओटीटी माध्यमांवर विविध प्रोजेक्ट करताना दिसली. सुरवीनची नुकतीच एक वेबसीरिज रिलीज झाली आहे. ती वेबसीरिज म्हणजे 'क्रिमिनल जस्टिस ४'. या वेबसीरिजमध्ये सुरवीन चावला आणि पंकज त्रिपाठींच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळतेय. यानिमित्त सुरवीनने कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव एका मुलाखतीत सांगितला आहे.

दिग्दर्शकाने किस करण्याचा प्रयत्न केला अन्...

सुरवीन चावलाने एका मुलाखतीत कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. सुरवीन म्हणाली,  "मी अनेकदा कास्टिंग काउचचा अनुभव घेतला आहे. मी तुम्हाला मुंबईतील वीरा देसाई रोडमध्ये घडणारी घटना सांगते. एका दिग्दर्शकाने मला त्याच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी बोलावलं होतं. मीटिंग झाल्यावर दिग्दर्शक मला गेटवर सोडण्यासाठी आला. माझं तेव्हा लग्न झालं होतं. आम्ही मीटिंगमध्ये माझ्या पतीबद्दलही चर्चा केली. मी जेव्हा दरवाजावर त्याला निरोप देण्यासाठी आली तेव्हा मला किस करण्यासाठी दिग्दर्शक थोडा खाली वाकला. त्यामुळे मला त्याला जोरात मागे ढकलावं लागलं."

"या घटनेमुळे मी दचकली. काय करतोयस, असं विचारुन मी निघून गेली. इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउच आणि पैशांचे गैरव्यवहार होत असतात. यावेळी अनेकदा धमक्यांनाही सामोरं जावं लागतं. या सर्व गोष्टी खूप त्रासदायक आहेत आणि हे खूप आधीपासून चालत आलो आहे." अशाप्रकारे सुरवीनने खुलासा केला. सुरवीनची सध्या 'क्रिमिनल जस्टिस ४' ही वेबसीरिज चांगलीच चर्चेत असून प्रेक्षकांना ही वेबसीरिज चांगलीच आवडत आहे.

टॅग्स :सुरवीन चावलाबॉलिवूडवेबसीरिजपंकज त्रिपाठी