Join us

आधी सासू-सासरे, मग नवऱ्याला संपवलं; हत्याकांडाने हादरलेला देश! सत्य घटनेवर आधारित 'ही' डॉक्युमेंट्री पाहून डोकं चक्रावेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:26 IST

आधी सासू-सासरे मग नवऱ्याला संपवलं; हत्याकांडाने हादरलेला देश, सत्य घटनेवर आधारित 'ही' डॉक्युमेंट्री पाहून अंगावर येईल काटा

Curry & Cyanide: The Jolly Joseph Case : गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे. त्यामुळे चित्रपट प्रेमींना घरबसल्या त्यांचे आवडते चित्रपट तसेच मालिका देखील सहज मोबाईलवर पाहणं शक्य झालं आहे. शिवाय हल्ली ओटीटीवर सत्य घटनेवर आधारित सीरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने क्राइम थ्रिलर सीरिजच्या निर्मितीतही वाढ झाली आहे.  अशीच एक डॉक्युमेंट्री सीरिज सध्या चर्चेत आहे. देशात घडलेल्या अतिशय भयंकर अशा सत्य घटनेवर आधारित ही डॉक्युमेंट्री आहे.'करी अॅंड सायनाईड :द जॉली जोसेफ केस' असं  या डॉक्युमेंट्रीचं नाव आहे.ही खरी कहाणी जॉली जोसेफ नावाच्या एका महिलेची होती,नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत एका महत्त्वाच्या पदावर काम करते.

केरळमधील जॉली जोसेफ प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. जॉली जोसेफ नावाच्या महिलेने १० वर्षात आपल्याच कुटुंबातील ६ सदस्यांची हत्या केली होती.मात्र, कोणालाच याची भनक लागत नाही. जवळपास १५ वर्षांनंतर हे प्रकरण भांडाफोड होऊन समोर आलं.केरळातील कोझिकोड जिल्ह्यातील कूडाथयी गावातील ही घटना आहे. सायनाइड या घातक विषाच्या साहाय्याने तिने कुटुंबियांची हत्या केली होती,पोलिसांना संशय आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.'करी अँड सायनाइड: द जॉली जोसेफ केस' ही डॉक्युमेंट्री २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली. याचं दिग्दर्शन क्रिस्टोफर टॉमी यांनी केलं आहे.एका सत्य घटनेवर बनवलेला माहितीपटाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

काय घडलेलं?

जॉलीच्या सासूची हत्या सर्वात आधी करण्यात आली. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजेच २००८ मध्ये निवृत्त शिक्षक असलेले सासरे टॉम थॉमस यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचं अनेकांना वाटलं. २०११ मध्ये, तिचा पती रॉय थॉमसचा अचानक  मृत्यू झाला. यानंतर सासरच्या मंडळींना खोटं सांगून जॉलीने पोस्टमॉर्टम करण्यापासून रोखले.यानंतर जॉलीचे मामे सासरे यांचाही मृत्यू होतो. मात्र, हे प्रकरण येवढ्यावर थांबत नाही. यानंतर २०१६ मध्ये रॉय थॉमसचा चुलतभाऊ आणि जॉलीचा दुसरा नवरा जकारियाची पहिली बायको सिली आणि त्यांच्या एक वर्षांच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू होतो. या सगळ्याची मास्टरमाईंड ही जॉली जोसेफ होती, असं पुराव्यानुसार सिद्ध झालं.

जॉली जोसेफच्या नणंदेने या मृत्यूंबद्दल शंका व्यक्त केली आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. १० वर्षात ६ निष्पाप लोकांच्या मृत्यूनंतरही पोलिसांना कोणताही ठोस पुरावा सापडला नाही शिवाय त्यांना कोणताही संशयित सापडला नाही. यानंतर, पोलिसांना आढळले की या मृत्यूंचे कारण सायनाइड होते.या गोष्टीचा तपास सुरू करण्यात आला आणि जॉलीला अटक करण्यात आली.

टॅग्स :वेबसीरिज